Skill Development esakal
उत्तर महाराष्ट्र

Skill Training: कौशल्य प्रशिक्षणासाठी सर्वेक्षण मोहीम! जिल्ह्यातील युवक-युवती, उद्योजकांना सहभागाचे आवाहन

सकाळ वृत्तसेवा

Skill Training : राज्य कौशल्य विकास सोसायटीतर्फे केंद्र व राज्य शासन पुरस्कृत विविध कौशल्य विकास प्रशिक्षण योजना राबविण्यासाठी युवक- युवतींच्या मागणीवर आधारित कौशल्य प्रशिक्षण देण्यासाठी कौशल्याची मागणी सर्वेक्षण मोहिमेचे आयोजन करण्यात आल्याची माहिती जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहाय्यक आयुक्त रा. वि. वाकुडे यांनी दिली. (Survey Campaign for Skill Training Youth and young women of district entrepreneurs invited to participate Dhule)

सर्वेक्षणामुळे युवक, युवतींना आवश्यक आणि त्यांनी मागणी केलेले कौशल्य प्रशिक्षण प्रदान केल्यास उमेदवारांच्या प्रशिक्षणादरम्यान वृद्धी होऊन अनुपस्थितीचे प्रमाण कमी होईल. प्रशिक्षणातील यशस्वी उमेदवारांना रोजगार व स्वयंरोजगारांच्या अधिक प्रमाणात संधी उपलब्ध होणार आहे.

यासाठी कौशल्य मागणी सर्वेक्षण मोहीम १ ते ३१ जुलै २०२३ दरम्यान आयोजित करण्यात आली आहे. सर्वेक्षणासाठी महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास सोसायटी, मुंबई यांच्यामार्फत गुगल फॉर्म तयार करण्यात आला असून, ‘कौशल्याची मागणी सर्वेक्षण’साठी

उद्योजक नोंदणी

जिल्ह्यातील उत्पादन व सेवा क्षेत्रातील सूक्ष्म लघु आणि मोठ्या उद्योगांमध्ये कुशल, अर्धकुशल व अकुशल अशा विविध प्रकारच्या रोजगारनिहाय आवश्यक असलेल्या कौशल्याची गरज नोंदवून अशा कौशल्यांच्या अभ्यासक्रमांचा समावेश कौशल्य प्रशिक्षणामध्ये करण्यासाठी उद्योजक नोंदणीसाठी जिल्ह्यातील सर्व उद्योजकांनी या गुगल लिंकला भेट देऊन आपल्या उद्योगातील कौशल्याची मागणी कळवावी.

युवक-युवतींना आवाहन

कौशल्याची मागणी सर्वेक्षण व उद्योजकांसाठी उद्योगांच्या मनुष्यबळामध्ये कौशल्याची आवश्यकता नोंदणी अशा दोन वेगवेगळ्या गुगल लिंक देण्यात आल्या आहेत.

तसेच कोणत्याही तांत्रिक अडचणी निर्माण होऊ नये म्हणून सोबत उमेदवारांसाठी ‘कौशल्याची मागणी सर्वेक्षण व ‘उद्योजकांसाठी उद्योगांच्या मनुष्यबळामध्ये कौशल्याची आवश्यकता नोंदणी‘ असे दोन वेगवेगळे क्यूआर कोड देण्यात येत आहे.

या दोन्ही सर्वेक्षण नोंदणी मोहिमेत जिल्ह्यातील जास्तीत जास्त युवक-युवतींनी व उद्योजकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहायक आयुक्त वाकुडे यांनी केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 1st T20I: Abhishek Sharma ने घडवला इतिहास, पावसाच्या सरींमध्ये इंग्लंडविरुद्ध वादळी फिफ्टी ठोकत विश्वविक्रम रचला

IND vs ENG: पहिल्या T20I सामन्यात ऐनवेळी ड्रामा; अभिषेक-श्रेयसने इंग्लंडला धुतलं, पण शेवटी पावसानं खोडा घातला

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

SCROLL FOR NEXT