burning vehicles esakal
उत्तर महाराष्ट्र

नशेत 10 वाहने पेटवणारा माथेफिरु अटकेत

- रईस शेख

जळगाव : शहरातील उच्चभ्रू रहिवासी असलेल्या आदर्शनगर परिसरात शुक्रवारी (ता. १३) तीन वेगवेगळ्या घटनांमध्ये घराबाहेर उभ्या असलेल्या वाहनांना माथेफिरुंनी पेटवले होते. रामानंदनगर पोलिस ठाण्यात दाखल या गुन्ह्यात पोलिसांनी संशयिताचा शोध घेत त्याला ताब्यात घेतले असून त्याने सोल्युशनच्या नशेत ही वाहने पेटवल्याचे समोर आले आहे.

डी-मार्टच्या मागील बाजूस आदर्शनगरातील प्लॉट क्रमांक १८६ आराध्या अपार्टमेंट व बाजूच्या घरांच्या कंपाऊंडमधील पार्किंगमध्ये उभ्या असलेल्या वाहनांना पेटवून दिल्याची घटना घडली होती. या आगीत एक सँट्रो (एमएच १९ एपी १३४५), क्रेटा (एमएच १९ सीव्ही ९४४०) या दोन कार पेटत असताना जाग आल्याने वाहनधारक अशोक राणे यांनी अग्निशमन दलास वेळीस पाचारण केले, तसेच परिसरतील रहिवाशांना जागे केल्यावर वाहने विझविण्यासाठी प्रयत्न करण्यात आले. असाच प्रकार सृष्टी अपार्टमेंटमध्ये देखील वाहने पेटवली.

त्यानंतर एसडी हाईट्समध्ये एक महागडी कारसहीत तीन मोटरसायकल जाळण्याचा प्रकार घडला होता. रामानंदनगर पोलिस ठाण्यात दाखल तक्रारीवरून संशयिताचा शोध सुरु झाला. निरीक्षक विजय शिंदे यांच्या गुन्हे शोध पथकातील विजय खैरे, संजय सपकाळे, रवींद्र चौधरी, जितेंद्र तावडे, सुशील चौधरी, प्रवीण जगदाळे, अजय सपकाळे यांच्या पथकाने परिसरातील सीसीटीव्हीची धुंडाळणी करुन घटनेच्या रात्री आढळून आलेल्या संशयिताचा शोध घेतला.

सोल्युशनचा नशा

सीसीटीव्ही फुटेजमध्ये चित्रित झालेला आकाश गणेश महाजन (वय २१, रा. तांबापुरा) याची ओळख पटल्यावर गुन्हे शोध पथकातील पोलिसांनी तो भटकत असलेल्या विविध अड्ड्यांवर त्याचा शोध चालवला. अखेर एका ठिकाणी तो सोल्युशनचा नशा करताना पोलिसांना आढळून आला असून त्याला ताब्यात घेतल्यावर त्याने गुन्ह्याची कबुली दिली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs NZ: Virat Kohli त्याचे सामनावीर ट्रॉफी कुठे ठेवतो? न्यूझीलंडविरुद्ध पुरस्कार जिंकल्यानंतर सांगून टाकलं

WPL 2026, DC vs GG: १ बॉल अन् ५ धावा... गुजरात जायंट्सने मिळवला थरारक विजय, जेमिमाच्या दिल्लीचा सलग दुसरा पराभव

२०१४पासून अदानीकरण! हे बघून भीती वाटली नाही तर निवडणूक न लढलेली बरी; राज ठाकरेंनी दाखवले VIDEO

Bigg Boss Marathi 6: ९० दिवस, १७ स्पर्धक; पाहा 'बिग बॉस मराठी ६' च्या घरातील स्पर्धकांची यादी

अजित पवारांना लाथ मारून हाकला किंवा माफी मागा, गाडीभर पुरावे कोर्टात द्या; भ्रष्टाचारावरून ठाकरे बंधूंनी फडणवीसांना घेरलं

SCROLL FOR NEXT