suspect esakal
उत्तर महाराष्ट्र

Dhule News : साताऱ्यातून संशयित गजाआड; एलीसीबीची कारवाई

सकाळ वृत्तसेवा

धुळे : रतनपुरा (ता. धुळे) शिवारात ट्रॅक्टरद्वारे (Tractor) शेतमातीच्या सपाटीकरणाचे काम करणाऱ्या सहकाऱ्याचा निर्घृण खून करून पसार झालेल्या संशयितास स्थानिक गुन्हे अन्वेषण

शाखेच्या (एलसीबी) पथकाने सातारा येथून गजाआड केले. (suspect brutally murdering his colleagues is arrested by local crime branch dhule news)

त्याला धुळे तालुका पोलिस ठाण्याच्या स्वाधीन केले. पोलिस अधीक्षकांनी पत्रकार परिषदेत मंगळवारी ही माहिती दिली.रोहिदास दादासाहेब जाधव (रा. निंबळक, ता. फलटण, जि. सातारा) असे संशयिताचे नाव आहे. तो आणि मृत आदर्श दत्तात्रय पिसाळ (रा. शेरे- शिंदेवाडी, जि. सातारा) हे दोघे रतनपुरा शिवारात सोबत ट्रॅक्टरद्वारे शेतमातीच्या सपाटीकरणाचे काम करत होते.

१२ फेब्रुवारीला रोहिदास याने मजुरीच्या पैशासाठी दारु पिऊन वाद घातला. नंतर ट्रॅक्टरचे स्टॅपलिंग रॉडने आदर्श याच्या डोक्यावर वार करुन त्याचा खून केला. याप्रकरणी शिवपाल प्रल्हाद पिसाळ (रा. शेरे- शिंदेवाडी) यांच्या तक्रारीवरुन धुळे तालुका पोलिस ठाण्यात संशयिताविरूद्ध गुन्हा दाखल झाला होता.

गुन्हा घडल्यापासून रोहिदास पळून गेला असल्याने पोलिस अधीक्षक संजय बारकुंड यांनी संशयिताचा शोध घेऊन त्यास अटकेचे आदेश स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलिस निरीक्षक हेमंत पाटील यांना दिले.

हेही वाचा : ..ही काळजी घ्या नाहीतर खिसा होईल साफ!

याअनुषंगाने गुन्ह्याचा समांतर तपास स्थानिक गुन्हे शाखेकडून सुरु असताना सोमवारी (ता. २०) पोलिस निरीक्षक हेमंत पाटील यांना माहिती मिळाली, की संशयित रोहिदास जाधव निंबळक (ता. फलटण) येथे पळून गेला आहे. त्यानुसार त्यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पथक फलटण (जि. सातारा) येथे रवाना झाले.

पथकाने फलटण ग्रामीण पोलिस ठाण्याच्या मदतीने संशयित रोहिदास जाधव यास मंगळवारी (ता. २१) निंबळक येथून ताब्यात घेतले. चौकशीत त्याने गुन्ह्याची कबुली दिली. त्याला पुढील तपासासाठी धुळे तालुका पोलिसांच्या ताब्यात दिले.

ही कारवाई पोलिस अधीक्षक संजय बारकुंड, अपर पोलिस अधीक्षक किशोर काळे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक हेमंत पाटील, योगेश राऊत, संजय पाटील, श्रीकांत पाटील, प्रभाकर बैसाणे, संदीप सरग, योगेश चव्हाण, कमलेश सूर्यवंशी, राहुल गिरी यांच्या पथकाने केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

गांधीजींनी २१ दिवस उपोषणात लिंबू तर सोनम सरांनी २६ दिवस फक्त...; अभिजीत दीपकेचा मोठा खुलासा

Abhijeet Dipke on Jai Bhim : 'जय भीम' हा नारा केवळ एका समाजाचा नाही; अभिजीत दिपके यांचे वक्तव्य, 'ब्लॅक अँड व्हाईट'मध्ये अनेक खुलासे

Abhijit Dipake: योगी, मोदी, BJP आयटी सेलचे लोक शिवीगाळ करतात, त्यांच्यावर FIR का नाही? अभिजीत दिपकेंचा सवाल

Sangli Kolhapur Flood Risk : कर्नाटकची मुजोरी अन् सांगली-कोल्हापूरला पुराचा धोका! आलमट्टी धरणाच्या पाणीसाठ्यावरून 'इरिगेशन फेडरेशन'चा इशारा

Latest Marathi News Live Update : अमित शहासुद्धा हसत असतील, भाजपची बी टीम असल्याच्या आरोपावर अभिजीत दीपकेचं उत्तर

SCROLL FOR NEXT