crime news
crime news  esakal
उत्तर महाराष्ट्र

Dhule Crime : धुळ्यात गॅस सिलिंडरचा अवैध साठा; अडीच लाखांचा मुद्देमाल जप्त

सकाळ वृत्तसेवा

Dhule Crime News : घरगुती वापराच्या गॅस सिलिंडरचा अवैधरीत्या साठा करून वाहनात भरणाऱ्या दोन संशयितांना एलसीबीच्या पथकाने शनिवारी (ता. २२) गजाआड केले. (suspects arrested by lcb police for illegally storing gas cylinders dhule Dhule Crime News)

सिलिंडर वाहतुकीच्या कारसह अडीच लाखांचा मुद्देमाल जप्त केला. या प्रकरणी देवपूर पोलिस ठाण्यात चौघांविरुद्ध गुन्हा दाखल असून दोघांना अटक झाली.

पोलिस अधीक्षक संजय बारकुंड यांनी सामाजिक उपक्रम राबविण्यासह कार्यक्रमांमध्ये योगदान देणे आणि त्याचप्रमाणे कायदा- सुव्यवस्था अबाधित राहण्यावर कटाक्ष ठेवला आहे. यात गैरउद्योगांना रोख लावण्यासाठी त्यांनी आक्रमक पावले उचलली आहेत. त्याबाबत योग्य त्या सूचना दिल्या आहेत.

त्यानुसार घरगुती गॅस सिलिंडरचा बेकायदेशीर साठा करून त्याचा वाहनात इंधन म्हणून वापर करण्यात येत असल्याची माहिती एलसीबीचे पोलिस निरीक्षक हेमंत पाटील यांना मिळाली. त्यानुसार पथकाने शनिवारी दुपारनंतर गिरीश ऊर्फ बबलू पांडुरंग चौधरी (रा. प्रोफेसर कॉलनी, वाडीभोक ररोड, देवपूर) याच्या घराच्या मागील मोकळ्या जागी छापा घातला.

हेही वाचा : संतुलित आहारातून रोखा फॅटी लिव्हरचा आजार

तेथे कामगार प्रदीप रूपचंद सूर्यवंशी (रा. विष्णूनगर, भतवाल टॉकीजजवळ, देवपूर) हा ओमनी कारमध्ये (एमएच १८ डब्ल्यू ०५७३) घरगुती वापराचा गॅस भरताना आढळला. त्याला वाहनमालक अमृत सुपडू वाघ (रा. इंदिरानगर, धुळे) याच्यासह ताब्यात घेण्यात आले. तसेच गिरीश ऊर्फ बबलू चौधरी याच्या घराची झडती घेतली असता घरात वीस भरलेले व १८ रिकामे भारत गॅस कंपनीचे सिलिंडर मिळाले.

याबाबत प्रदीप सूर्यवंशी याने चौकशीत गिरीश ऊर्फ बबलू चौधरी याने हरी ओम गॅस एजन्सीतून (लामकानी, ता. धुळे) सिलिंडर आणल्याचे सांगितले. पथकाने एक लाख ३५ हजारांचे ३८ सिलिंडर, एक लाखाची ओमनी कार, तसेच पंधरा हजारांचे गॅस भरण्यासाठी उपयोगातील वीजमोटार, वजनकाटा, नोझल, असा अडीच लाखांचा मुद्देमाल जप्त केला.

याप्रकरणी संशयित प्रदीप सूर्यवंशी, अमृत वाघ, बबलू चौधरी, हरी ओम गॅस एजन्सीच्या मालकाविरुद्ध देवपूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. पोलिस अधीक्षक संजय बारकुंड, अपर पोलिस अधीक्षक किशोर काळे यांच्या मार्गदर्शनाखाली एलसीबीचे पोलिस निरीक्षक हेमंत पाटील, योगेश राऊत, संदीप सरग, योगेश चव्हाण, कमलेश सूर्यवंशी, राहुल गिरी, देवेंद्र ठाकूर, जगदीश सूर्यवंशी, कैलास महाजन यांनी ही कारवाई केली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Amit Shah Fake Video Case : झारखंड काँग्रेसचं एक्स अकाऊंट सस्पेंड; अमित शाह व्हिडीओ प्रकरणात मोठी कारवाई

Google Error : गुगल डाऊन! जगभरातील युजर्स त्रस्त; अमेरिकेतून 1400 तक्रारी

Yogi Adityanath : काँग्रेस सत्तेत आल्यास हिंदूंची विभागणी होईल - योगी आदित्यनाथ

IPL 2024, CSK vs PBKS: चेन्नईला पंजाबच्या गोलंदाजांनी रोखलं अन् फलंदाजांनी ठोकलं; ऋतुराजसेनेचा बालेकिल्ल्यात दुसरा पराभव

Loksabha election 2024 : जेडीयूचे माजी प्रदेशाध्यक्ष शशांक राव यांचा भाजपात प्रवेश; उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची उपस्थिती

SCROLL FOR NEXT