Building of Taluka Sports Complex lying unused and blackened esakal
उत्तर महाराष्ट्र

Nandurbar News: तळोदा तालुका क्रीडासंकुल काळवंडले! एक कोटीचा निधी वाया; क्रीडाप्रेमींमधून नाराजी व्यक्त

सम्राट महाजन

तळोदा : लोकार्पणाच्या सात वर्षांनंतरदेखील तळोदा क्रीडासंकुलाला खेळाडू पोरके आहेत. क्रीडासंकुलाचा वापर होत नसल्याने अक्षरशः ते काळवंडले आहे आणि दिवसेंदिवस त्याची दुरवस्था होत आहे.

त्यामुळे ज्या उद्देशाने क्रीडासंकुल तयार करण्यात आले तो उद्देशच सफल झाला नसल्याने क्रीडाप्रेमींमधून संतापयुक्त नाराजी व्यक्त होत आहे.

दरम्यान, क्रीडासंकुल तयार होण्यासाठी सुमारे एक कोटीचा निधी खर्च झाला असून, एकंदरीत परिस्थिती पाहता आता हा एक कोटीचा निधी वायाच गेला, असेच म्हणावे लागेल. (Taloda Taluka sports complex turned black Fund of one crore wasted Expression of displeasure from sports lovers Nandurbar News)

तळोद्यातील व तालुक्यातील खेळाडूंना एकाच छताखाली अनेक खेळ उपलब्ध व्हावेत, ग्रामीण भागातील खेळाडूंना योग्य मार्गदर्शन मिळून त्यांनी क्रीडाप्रकारात प्रावीण्य मिळवावे या हेतूने तत्कालीन मंत्री पद्माकर वळवी यांनी तालुका क्रीडासंकुलाला मंजुरी मिळवून दिली होती.

त्यानंतर तत्कालीन आमदार उदेसिंग पाडवी यांनी पुढाकार घेत शहरातील आयटीआय कॉलेजच्या मागे क्रीडासंकुलाची इमारत उभारण्यासाठी मनापासून प्रयत्न केले.

त्यामुळे क्रीडासंकुल तयार होत १० जून २०१७ ला तत्कालीन लोकप्रतिनिधींच्या प्रमुख उपस्थितीत संकुलाचे लोकार्पण करण्यात आले होते. मात्र लोकार्पण होऊन सात वर्षांचा कालावधी उलटला असला, तरी क्रीडासंकुल खेळाडूंसाठी खुले करण्यात आलेले नाही.

क्रीडासंकुलाची दुरवस्था

सध्या या क्रीडासंकुलाच्या कोणताही उपयोग होत नाही. त्यामुळे संकुलाच्या आतील भागात पक्ष्यांनी आपले घरटी बनविलेली आहेत. ठिकठिकाणी जाळे पसरलेले असून, संपूर्ण वास्तू हळूहळू काळवंडून चालली आहे.

पाण्यासाठी केलेल्या जलवाहिन्या ठिकठिकाणी तुटल्या आहेत. संकुलाच्या बाजूला असलेल्या जागेवर खो-खो व कबड्डी खेळाची मैदाने तयार होणार असल्याचे बोलले जात होते. मात्र आता तिथे कचरा व शेणाचे साम्राज्य दिसून येते.

त्या परिसराला खेळाच्या मैदानाची अजूनही प्रतीक्षाच आहे. वापराविना संकुलाचा परिसर अतिशय भकास झाला असून, दिवसेंदिवस संकुलाची अवस्था वाईट होत आहे.

एक कोटी वाया

सात वर्षे झाली तरी क्रीडासंकुल बंद आहे. त्यामुळे मैदानाचा विकास झाला नाही आणि त्याला कुंपण नाही अशी अवस्था संकुलाची झाली आहे.

खेळाडूंची शारीरिक क्षमता वाढून नवीन खेळाडू तयार व्हावेत व आरोग्यदायी नवीन पिढी तयार व्हावी यासाठी क्रीडासंकुल असताना एकंदर परिस्थिती लक्षात घेता आता संकुलाचेच आरोग्य बिघडल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे शासनाचे एक कोटी रुपये वाया गेले असेच वाटते आहे.

सिस्टिमचा इंटरेस्ट संपला

क्रीडासंकुलासारख्या भव्य इमारती तयार करण्यासाठी शासनाचा मोठा निधी खर्च होत असतो. सर्व सिस्टिम (यंत्रणा) क्रीडासंकुलासारखी एखादी वास्तू तयार करण्यासाठी जो उत्साह व इंटरेस्ट दाखविते तोच उत्साह व इंटरेस्ट त्या वास्तूचे बांधकाम पूर्ण झाल्यावर ती वास्तू उपयोगात आणण्यासाठी दाखवत नाही, हे तितकेच खरे आहे.

कारण वास्तू तयार झाल्यानंतर त्यामधील सिस्टिमचा सर्व इंटरेस्ट संपलेला असतो असे यानिमित्ताने बोलले जात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

School Bus Rules: मनमानीला पूर्णविराम! शाळा बस भाडे प्रादेशिक परिवहन प्राधिकरण ठरवणार; महाराष्ट्रात नवीन नियमांमुळे चित्र बदलणार

CSK vs DC Controversy: फुल्ल राडा! नितीश राणासह दिल्लीचे कोच अम्पायरला भिडले; सीमारेषेवर भांडण, नेमकं काय घडलं? Video

Mumbai News: मुंबईतील सर्वात मोठ्या डेपोचा ‘टर्निंग पॉइंट’! ‘क्लीन-अप’चा मार्ग मोकळा; स्वच्छतेमुळे बदलणार परिसराचं चित्र

CSK vs DC Live: संजू सॅमसनचे शतक, सर्फराज खानचा अविश्वसनीय झेल अन्...; चेन्नईचा पहिला विजय, IPL 2026 Point Table मध्ये बदल

Vande Bharat Express : पुणे-बंगळूरसाठी आता वंदे भारत स्लीपर एक्स्प्रेस; १३ तासांत पोहोचणार

SCROLL FOR NEXT