tapi river file photo esakal
उत्तर महाराष्ट्र

Dhule News : तापी पाणीपुरवठा योजनेलाही बळकटी! 3 नवीन पंप दाखल

सकाळ वृत्तसेवा

Dhule News : एकीकडे अक्कलपाडा पाणी योजनेचे काम अंतिम टप्प्यात आले असताना याच योजनेत मंजूर तापी पाणीपुरवठा योजनेच्या दुरुस्तीचे कामही हाती घेण्यात आले आहे. यासाठी २०० एचपी क्षमतेचे तीन पंप बसविण्यात येणार आहेत.

हे नवीन पंप सुकवद पंपिंग स्टेशन व बाभळे जलशुद्धीकरण केंद्रांवर दाखल झाले आहेत. (Tapi water supply scheme strengthened 3 new pumps introduced Dhule News)

अक्कलपाडा पाणीपुरवठा योजना मंजुरीत अस्तित्वातील तापी पाणीपुरवठा योजनेच्या दुरुस्तीसाठी एकूण सात कोटी ६२ लाख ९७ हजार ७४१ रुपये मंजूर झाले. यात रॉ वॉटर पंपिंग मशिनरीसाठी तीन कोटी ३३ लाख ३४ हजार ७७७ रुपये मंजूर आहेत.

याशिवाय डेडरगाव पाणीपुरवठा योजनेच्या दुरुस्तीसाठी तीन कोटी ६२ लाख ३१ हजार ३५१ रुपये मंजूर आहेत. या मंजुरीतून सध्या तापी योजनेच्या दुरुस्तीचे कामही हाती घेण्यात येत आहे. पाचपैकी दोन जुने पंप काढले जाणार आहेत.

त्यामुळे जुने तीन व नवीन तीन असे एकूण सहा पंप तापी योजनेसाठी असतील. पाणीटंचाईच्या स्थितीमुळे सध्या चार पंप सुरू ठेवले आहेत; परंतु हे पंप जुने असल्याने ते नादुरुस्त होण्याचे प्रमाण अधिक आहे.

गेल्या आठवड्यात एक पंप बंद पडला होता. यामुळे शहरातील पाणीपुरवठ्याचे नियोजन कोलमडले होते. नवीन तीन पंप अत्याधुनिक आहेत. ते अधिक क्षमतेने कार्यरत राहतील. त्यामुळे शहरासाठी पूर्ण दाबाने पाणी मिळेल, त्यातून पाणी वितरणातील समस्याही दूर होतील, अशी अपेक्षा आहे.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

३५ वर्षे जुनी योजना

तापी पाणीपुरवठा योजना १९८८ पासून कार्यान्वित आहे. या योजनेला ३५ वर्षांहून अधिक काळ लोटला आहे. या योजनेंतर्गत सुलवाडे बॅरेजमध्ये शहरासाठी ४९७ एमसीएफटी पाणी आरक्षित ठेवले जाते. सुमारे ४५ किलोमीटर अंतरावरून या योजनेद्वारे पाणी धुळे शहरात आणले जाते.

त्यातून ६० टक्के शहराची पाण्याची तहान भागविली जाते. याशिवाय नकाणे तलाव, हरणमाळ तलाव, डेडरगाव तलावातूनही पाणी घेतले जाते. विशेषतः तापी योजनेवर मोठा भार असल्याने शहरात चार-पाच दिवसांआड पाणी देण्याचे नियोजन केले आहे.

मात्र, विविध तांत्रिक अडचणींमुळे वारंवार पाणीपुरवठ्याचे नियोजन कोलमडते. अक्कलपाडा योजनेसह तापी योजनेला बळकटीतून हे नियोजन सुरळीत होईल, धुळेकरांना किमान दिवसाआड पाणी मिळेल, अशी अपेक्षा आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Congress review meeting chaos : बिहार निवडणुकीत दारुण पराभवामुळे दिल्लीत काँग्रेसच्या आढावा बैठकीत गोंधळ; नेत्यांमध्ये जोरदार वाद!

Santosh Deshmukh Case: फरार कृष्णा आंधळेच्या शोधाबाबत अहवाल सादर करा; न्यायालयाच्या सूचना; १२ डिसेंबरला आरोप निश्‍चिती शक्य

Pune Police : आंदेकर टोळीने उमरटीतून १५ पिस्तुले विकत घेतली;टोळीवर आणखी एक गुन्हा दाखल होणार!

Ghodegaon Theft : घोडेगाव पोलीस ठाणे हद्दीत रात्रीच्या चोरीप्रकरणी दोन आरोपी अटकेत!

Pune New Police Stations : पुणेकरांसाठी महत्त्वाची बातमी! ; शहरात पाच नवीन पोलिस स्टेशन्स वाढणार, जाणून घ्या कुठे?

SCROLL FOR NEXT