SSC HSC Board exam  esakal
उत्तर महाराष्ट्र

Board Exam : परीक्षार्थी विद्यार्थ्यांना घाबरवू नका; शिक्षकभारती

सकाळ वृत्तसेवा

धुळे : दहावी, बारावीच्या परीक्षेत (Exam) विद्यार्थ्यांनी कॉपी केल्यास गुन्हा दाखल करणार, परीक्षा केंद्र परिसरात कलम १४४ लागू करणार, कॉपी केल्यास पाच वर्षे डिबार करणार, विद्यार्थी अर्धा तास

उशिरा आल्यास परीक्षा देण्यास मज्जाव करणार यासह विविध घाबरविणारे, दहशत पसरविणारे संदेश सोशल मीडिया, तसेच काही स्थानिक चॅनल्सद्वारे प्रसारित केले जात आहेत. (Teacher Bharti Association demanded examination board should take serious note of message circulating related to exam dhule news)

परीक्षार्थी विद्यार्थ्यांचे मनोबल उंचावण्याऐवजी खच्चीकरणाचे संदेश पोस्ट करण्याचा प्रयत्न असमर्थनीय असून, परीक्षा मंडळाने याची गंभीर दखल घेण्याची मागणी जिल्हा शिक्षकभारती संघटनेने केली आहे.

दहावी, बारावीची परीक्षा लवकरच सुरू होत आहे. त्यापूर्वी विद्यार्थ्यांमध्ये दहशत पसरविण्याचा प्रयत्न केला जात आहे. वास्तविक, परीक्षेच्या काळात विद्यार्थ्यांमध्ये ताणतणाव निर्माण होत असतो. यादरम्यान अनेक विद्यार्थी टोकाची पावले उचलतात.

त्यामुळे विद्यार्थ्यांचे मनोधैर्य टिकवून ठेवणे समाजातील प्रत्येकाची जबाबदारी आहे; परंतु सोशल मीडिया, तसेच काही चॅनल्सचा गैरवापर करत विद्यार्थ्यांचे मनोबल खच्चीकरणाचा चुकीचा प्रकार निदर्शनास येत आहे.

हेही वाचा : अल्पमतातील निवाडे आणि सामान्य माणूस

विद्यार्थ्यांचे मनोधैर्य टिकवून ठेवण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही ‘परीक्षा पे चर्चा’ कार्यक्रम घेतला. असे असताना विद्यार्थ्यांसह पालकांना घाबरविणाऱ्या संदेशांची बाब आक्षेपार्ह आहे. त्याची शासन, प्रशासनाने गंभीर दखल घेतली पाहिजे.

अनेक शाळांत सीसीटीव्ही बसविण्याची मागणी असताना त्यासाठी पैसे उपलब्ध करून दिले जात नाहीत. विविध समस्या सोडविल्या जात नाहीत. दहावी, बारावी बोर्डाने परीक्षा पारदर्शकतेने होण्यासाठी चुकीचे संदेश पसरविणाऱ्यांचा बंदोबस्त करावा, अन्यथा आंदोलनासाठी रस्त्यावर उतरावे लागेल,

असा इशारा शिक्षकभारतीचे राज्य संघटक सचिव अशपाक खाटीक, जिल्हाध्यक्ष आबासाहेब पाटील, कार्याध्यक्ष खेमचंद पाकळे, सचिव नाना महाले, उपाध्यक्ष सुधाकर पाटील, शैलेश धात्रक, महानगर अध्यक्ष दीपक पाटील, धुळे तालुकाध्यक्ष किरण मासुळे, साक्री तालुकाध्यक्ष जयवंत पाटील, शिरपूर तालुकाध्यक्ष रावसाहेब चव्हाण, विनोद रोकडे, इम्रान खान, अमीन कुरेशी, मुश्ताक शेख, कैलास अमृतकर, समाधान वाणी, दामोदर पाटील, राजेश शिरोडे आदींनी दिला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Raj Thackeray: उद्धव ठाकरे आणि शिवसेनेपासून राज ठाकरे दूर का होत गेले? वाद ते मनोमिलन timeline

IND vs ENG 2nd Test: शुभमन गिलच्या ३००+ धावा! मोडला विराट कोहलीचा ११ वर्षांपूर्वीचा विक्रम, रिषभ पंतचीही फिफ्टी

Sushil Kedia: माज उतरला, पण गुर्मी कायम; माफीनंतरही नवं ट्विट करत सुशील केडिया पुन्हा बरळले, शहांची स्तुती तर ठाकरेंना...

Divyang Students Demand : दिव्यांग विद्यार्थ्यांची होतेय कुचंबना! ३० जुलैपर्यंत वसतिगृहाचा प्रश्न मार्गी लावा अन्यथा...; विद्यार्थ्यांचा सरकारला इशारा

Raigad News: अलिबाग मार्गावरील कोंडी सुटणार, प्रवाशांचा आरामदायी प्रवास होणार; सरकारचा प्लॅन सत्यात उतरणार

SCROLL FOR NEXT