teacher Molested student dhule crime news esakal
उत्तर महाराष्ट्र

Dhule Crime News : शिक्षकाने विदयार्थीनीला तुला पुस्तके, पेन, कलर देतो म्हणत घरी नेले अन...

सकाळ वृत्तसेवा

धुळे : खासगी शिकवणी घेणाऱ्या शिक्षकाने क्लासमधील विद्यार्थिनीचा विनयभंग केल्याची निंदनीय घटना शहरातील देवपूर भागात घडली.

याप्रकरणी शिक्षकाविरुद्ध (Teacher) पश्‍चिम देवपूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. त्याला अटकही करण्यात आली. (teacher Molested student dhule crime news)

इयत्ता आठवीत शिकणारी १३ वर्षीय मुलगी संशयित परेश दत्तात्रय सोनवणे (वय ४९, रा. शिवाजी नगर, वाडीभोकर रोड, धुळे) याच्याकडे क्लाससाठी जायची. नेहमीप्रमाणे २ मार्चला सकाळी साडेआठच्या सुमारास ती शिकवणीसाठी गेली होती.

त्यावेळी संशयित परेश सोनवणे याने ‘तुला एमटीएसचे पुस्तके, पेन, कलर देतो’ असे म्हणून त्याच्या घरी नेले. विद्यार्थिनीशी अश्लील हावभाव करत तो स्वत: विवस्त्र झाला. शिवाय, मुलीला अश्लील चित्रण दाखविले. पीडित मुलीने हा प्रकार घरी सांगितल्यानंतर तिच्या कुटुंबीयांना जबर मानसिक धक्का बसला.

हेही वाचा : ही चाळीस वर्षे जुनी बलाढ्य बँक ४८ तासात बुडालीच कशी?

त्यामुळे १५ दिवसांनंतर त्यांनी पोलिस ठाणे गाठत शिक्षकाविरुद्ध तक्रार दिली. पोलिसांनी गुरुवारी रात्री साडेनऊला संशयिताला ताब्यात घेतले. त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिस उपनिरीक्षक डी. एन. चव्हाण तपास करत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Devendra Fadnavis: पिके करपली, दुष्काळाचे संकट गडद; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले एनडीआरएफची वाट पाहणार नाही, आधीच शेतकऱ्यांना मदत देणार

खासदार ओमराजे निंबाळकरांना मोठा दिलासा, 'तो' गुन्हा रद्द; हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निकाल

NSE IPO: देशातील सर्वात मोठा IPO खुला! 14 हजारांच्या गुंतवणुकीवर किती फायदा? कधी होणार लिस्टिंग? जाणून घ्या सर्व

Bijli Tigress: संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील वाघीण 'बिजली'चा मृत्यू

Gauri Avahan 2026: गौराई घरात घेताना माप ओलांडणं का महत्त्वाचं? सांडलेल्या धान्याचंही आहे खास महत्त्व

SCROLL FOR NEXT