suspect with police esakal
उत्तर महाराष्ट्र

Dhule News : गावठी कट्टा, काडतुसासह संशयित धुळ्यात ताब्यात

सकाळ वृत्तसेवा

धुळे : शहरातील चाळीसगाव रोड चौफुलीवर द्वारका लॉजजवळ स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने एका संशयिताला गावठी कट्ट्यासह पकडले. त्याच्याकडून २५ हजारांचा कट्टा आणि जिवंत काडतुसे जप्त केली. (team of local crime investigation branch arrested suspect with With Gavthi Katta dhule crime news)

शहरातील हाजीनगर परिसरातील मोहम्मद शाहीद रियाज अहमद हा दहशत माजविण्याच्या उद्देशाने गावठी कट्टा घेऊन फिरत असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक हेमंत पाटील यांना मिळाली. त्यानुसार चाळीसगाव रोड चौफुली परिसरातील द्वारका लॉजजवळ पोलिसपथक पोचले.

संशयित मोहम्मद अहमद याला ताब्यात घेत अंगझडती घेतली असता त्याच्याकडे गावठी कट्टा आणि एक जिवंत काडतूस, असा २६ हजारांचा मुद्देमाल आढळला. त्याच्याविरुद्ध चाळीसगाव रोड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला.

हेही वाचा : 'पठाण'..आणि २०२३ मधले बाॅलीवूड..कसे असतील दिवस

पोलिस अधीक्षक संजय बारकुंड, अपर पोलिस अधीक्षक किशोर काळे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक हेमंत पाटील, योगेश राऊत, बाळासाहेब सूर्यवंशी, प्रकाश पाटील, अशोक पाटील, संदीप सरग, कुणाल पानपाटील, उमेश पवार, रवी किरण राठोड, विशाल पाटील आदींनी कारवाई केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bengaluru Theft : बंगळुरूमध्ये RBI अधिकारी बनून 7 कोटींची लूट! सिनेमालाही लाजवेल अशी फिल्मी स्टाइल चोरी

Latest Marathi News Update LIVE : चुटकीवाला भोंदू मांत्रिकाच्या दरबारावर पोलिसांची धडक कारवाई

Feng Shui Turtle: घरी कासव ठेवण्यापूर्वी 'या' गोष्टी जाणून घ्या, वाढेल बँक बॅलेन्स अन् नोकरीत मिळेल प्रमोशन

Video Viral: टिकी टाका नाही झटपट पटापट... फुटबॉलमधील ला लीगाला सुद्धा लागला डॅनीचा नाद

Latur Extortion Case: डॉक्टरकडे खंडणी मागणारे तिघे अटकेत; लातूर शहरामध्ये कारवाई, एकूण सात जणांविरुद्ध गुन्हा

SCROLL FOR NEXT