Crime News esakal
उत्तर महाराष्ट्र

Nandurbar Crime News : आयडीबीआय बॅंकेच्या एटीएममधून चोरी

सकाळ वृत्तसेवा

Nandurbar News : शहरातील आयडीबीआय बॅंकेच्या एटीएममधून १५ दिवसांत दोनदा चोरी झाली असून, त्यात १८ हजार चारशे रुपये काढण्यात आले आहेत. एटीएम मशिनचे नुकसान करण्यात आले आहे. चोरटा सीसीटीव्हीत कैद झाला असून, त्याने तोंडाला स्कार्प बांधला आहे. (Theft from IDBI Bank ATM Nandurbar Crime News)

याबाबत शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शहरातील रघुवंशी कॉम्प्लेक्समध्ये असलेल्या आयडीबीआय बॅंकेच्या एटीएममध्ये ३ एप्रिलला पैसे निघण्याचे शटर तुटलेले आढळले होते. ते बॅंकेने एखाद्या ग्राहकाकडून तुटले असावे असे समजून दुरुस्त केले होते. त्यानंतर पुन्हा १८ एप्रिलला पैसे निघत असलेले शटर तुटलेले आढळले.

त्यामुळे बॅंकेच्या अधिकाऱ्यांना संशय आला. त्यांनी बॅंक व एटीएम असलेल्या परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले. त्यात १८ एप्रिलला सकाळी सव्वासातच्या सुमारास १८ ते १९ वर्षांचा तरुण तोंडाला स्कार्प बांधून एटीएम मशिनमधून स्टीलची पट्टी टाकून पैसे काढताना दिसून येत आहे. त्या दोन्ही दिवशी मिळून १८ हजार दोनशे रुपये त्याने एटीएममधून लांबविले.

हेही वाचा : संतुलित आहारातून रोखा फॅटी लिव्हरचा आजार

तसेच कॅश जमा करण्याच्या मशिनमध्येही कागदाची पट्टी टाकून ते खराब केले आहे. याबाबत बॅंकेचे अधिकारी भूषण मुकुंद विश्‍वंभर यांनी नंदुरबार शहर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शहर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक रवींद्र कळमकर तपास करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पुरात वाहून गेला हत्ती! नागालँडमधून १०० किमी दूर पोहोचला आसामला, वनविभागाच्या प्रयत्नामुळे वाचला जीव

Jantar Mantar: देशातल्या 'या' शहरांमध्ये आहे दिल्लीसारखं जंतर-मंतर! वाचा वेधशाळांचा रंजक इतिहास!

Latest Marathi News Update : मुंबई लोकलमध्ये थरार, विलेपार्ले स्थानकात ५ स्फोटांचा आवाज

Koyna Dam: कोयना धरणात २४ तासांत ३ टीएमसी पाण्याची भर; पाणीसाठा ७५ टीएमसीवर, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा

पेपर लीक आंदोलनानंतर दिल्लीत E20 इंधन धोरणाविरोधात टॅक्सी संघटनांचा एल्गार; 4 ऑगस्टला संसद मार्चची घोषणा!

SCROLL FOR NEXT