Crime News esakal
उत्तर महाराष्ट्र

Dhule Crime News : चिमठाण्यात महिलेला ठार करण्याची धमकी देत जबरी चोरी

सकाळ वृत्तसेवा

Dhule Crime News : चिमठाणे (ता. शिंदखेडा) येथे बुधवारी (ता. २१) रात्री एक-दीडच्या सुमारास ओट्यावर झोपलेल्या ६५ वर्षीय आजी व नातवाला करण्याची धमकी देत घरातील गोदरेज कपाटातली रोख अडीच लाख रुपये,

३३ हजार ३०० रुपयांचे सोन्या-चांदीचे दागिने असा एकूण दोन लाख ८३ हजार ३०० रुपयांचा ऐवज चार चोरट्यांनी नेल्याचा गुन्हा सायंकाळी सातच्या सुमारास शिंदखेडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला.

चिमठाणे येथे बुराई नदीकाठावर विविध कार्यकारी सेवा संस्थेचे माजी अध्यक्ष देवीदास नगराळे यांचे घर असून, ते मंगळवारी रात्री शेतात गेले होते. (theft of three lakhs in Chimthana dhule crime news)

ओट्यावर पत्नी सुशीलाबाई नगराळे (वय ६४) व नातू हर्षवर्धन भटू नगराळे झोपलेले असताना रात्री एक-दीडच्या सुमारास अनोळखी ३५ ते ४० वर्षीय वयाचे चार तरुण बुराई नदीकडून आले.

त्यातील एकाने भगव्या रंगाचा हाफ बाह्यांचा टी-शर्ट व पांढऱ्या रंगाची जीन्स पॅन्ट, दुसऱ्याने काळ्या रंगाचा गोल गळ्याचा हाफ बाह्यांचा टी-शर्ट व काळ्या रंगाची बर्म्युडा पॅन्ट, तिसऱ्याने निळ्या रंगाचा फुल बाह्यांचा शर्ट व निळसर रंगाची जीन्स पॅन्ट व चौथाने हिरव्या रंगाचा हाफ बाह्यांचा शर्ट व निळसर रंगाची जीन्स पॅन्ट परिधान केली होती.

त्यांनी विचारपूस न करता घराचा दरवाजा उघडला दोघे घरात घुसले व इतर दोघांनी सुशीलाबाई व हर्षवर्धन यांना अडवून ठेवले. तुम्ही जर आरडाओरडा केला तुम्हाला मारून टाकू, अशा धमक्या देत ते एकमेकांना ‘बंदूक आण यांना मारून टाकू,’ असे एकमेकांशी हिंदीत बोलत होते. त्यानंतर ते अंधाराचा फायदा घेऊन बुराई नदीच्या दिशेने पळून गेले.

त्यानंतर लहान मुलगा दीपक नगराळे व त्याची पत्नी छायाबाई नगराळे यांना गोदरेज कपाटाची तोडफोड केलेली दिसली.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

चोरट्यांनी कपाटाच्या तिजोरीतील अडीच लाख रुपये, चार हजार ५०० रुपये किमतीच्या दहा ग्रॅम वजनाच्या सोन्याच्या दोन अंगठ्या, २४ हजार रुपये किमतीच्या ६० भार वजनाच्या चांदीच्या गोठ पाटल्या,

दोन हजार रुपये किमतीची पाच भार वजनाची चांदीची चेन, दोन हजार रुपये किमतीचे पाच भार वजनाचे पायातील चार जोडवे व ८०० रुपये किमतीच्या दोन भार वजनाच्या दोन चांदीच्या अंगठ्या असा ऐवज चोरून नेला. सुशीलाबाई नगराळे यांनी शिंदखेडा पोलिस ठाण्यात फिर्याद दिल्याने चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस निरीक्षक सुनील भाबड तपास करीत आहेत.

पोलिस अधिकाऱ्यांची भेट

चिमठाणे येथील देवीदास नगराळे यांच्याकडे जबरी चोरी झाल्याने घटनास्थळी शिरपूर उपविभागीय पोलिस अधिकारी सचिन हिरे, शिंदखेडा पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक सुनील भाबड, सहाय्यक पोलिस निरीक्षक प्रशांत गोरावडे, गुन्हा अन्वेषण विभागाचे उपनिरीक्षक प्रकाश पाटील, योगेश राऊत, चिमठाणे पोलिस दूरक्षेत्राचे हवालदार सदेंसिंग चव्हाण, नाईक प्रशांत पवार आदींनी सकाळी भेट दिली. सकाळी श्वानाने बुराई नदीपर्यंत माग शोधला व ठसेतज्ज्ञांनी ठसे घेतले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Yashasvi Jaiswal: मला एक दिवस कॅप्टन व्हायचंय! जैस्वालची 'मन की बात'; शुभमन गिलसमोर उभा राहिला स्पर्धक

Prashant Kishor Statement : बिहार निवडणुकीच्या तारखांच्या घोषणेनंतर, आता प्रशांत किशोर यांनी केलं मोठं विधान, म्हणाले...

PM Modi Calls Chief Justice Gavai: सरन्याधीश गवईंना पंतप्रधान मोदींचा फोन; सर्वोच्च न्यायालयातील 'त्या' घटनेची घेतली गंभीर दखल!

तयारीला लागा! सोलापूर जिल्ह्यातील १७ पैकी ‘या’ १३ नगरपरिषदांमध्ये महिला होणार नगराध्यक्षा; नगरसेवकांच्या आरक्षणाची बुधवारी सोडत

Pune News : आमदार बापू पठारे यांना धक्काबुक्कीप्रकरणी २० जणांवर गुन्हा दाखल

SCROLL FOR NEXT