seeds news
seeds news esakal
उत्तर महाराष्ट्र

Sakal Special : अनधिकृत बियाण्याच्या गोरख धंद्याचा पर्दाफाश होणे गरजेचे

कमलेश पटेल

Nandurbar News : गुजरातमधील बडोदा येथून विनापरवाना येणारे ११ लाख किमतीची ८५७ कपाशी बियाण्याची पाकिटे कृषी विभाग व पोलिस यंत्रणेने सापळा रचून सारंगखेडा पोलिस ठाण्याच्या हद्दीत पकडली.

त्यामुळे परिसरातील अनेक शेतकरी या खरिपात बोगस बियाण्याचा लागवडीपासून वाचले आहेत. असे असले तरी जिल्ह्यालगत गुजरात राज्यातून गेल्या पाच वर्षांपासून परिसरात बोगस व अनधिकृत बियाण्याचा गोरख धंदा फोफावला आहे.

तपासाअंती बोगस बियाण्यांचा रॅकेटचा पर्दाफाश होईल की कारवाई निमित्तमात्र राहील याविषयी सुज्ञ नागरिकांमध्ये प्रश्न उपस्थित होत आहे.(There need to expose the dirty business of unauthorized seeds issue of bogus seeds discussed after trap by Agricultural Department and Sarangkheda Police Nandurbar News )

केवळ शेतीवरच आपली उपजीविका भागवणारा परिसरातील शेतकरी कधी अतिवृष्टी, तर कधी अवर्षणाचे तडाखे सोसत जगत आला आहे. विपरीत परिस्थितीतही डगमगून न जाता, आहे त्या परिस्थितीत संघर्ष करत उभा आहे.

मात्र या दुर्दम्य आशावादातही त्याला अनेक नैसर्गिक आणि मानवनिर्मित फटके बसतात. त्यात प्रामुख्याने कर्ज उभारून केलेल्या शेतीत जेव्हाच पीकच उगवत नाही. उगवले तरी त्याची वाढच होत नाही. फलधारणाच होत नाही.

असे घडल्यानंतर त्याच्यासमोर काहीही पर्याय राहत नाही. त्याच्या या अवस्थेला कारणीभूत ठरणाऱ्या अनधिकृत (बोगस) बियाण्यांची निर्मिती आणि विक्री करणाऱ्या नफेखोर कंपन्यांना पायबंद घालण्याचे कायमस्वरूपी उपाय मात्र कधीच झाले नाहीत.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

भरदार बियाणे, दमदार उत्पादन, त्यात इतर नामांकित कंपन्यांच्या भावापेक्षा किंमत कमी आणि हमखास पिकणार याची हमी देत तालुक्यात बोगस बियाणे शेतकऱ्यांच्या जिवावर उठले आहे. दर वर्षी शेकडो एकर जमीन या बोगस बियाण्यांमुळे पडीक राहत असल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे.

सारंगखेडा येथे कृषी विभागाने येथील पोलिस यंत्रणेच्या मदतीने शुक्रवारी तब्बल ११ लाख रुपयांचे बनावट बियाणे एका वाहनात सापळा रचून पकडले. त्यामुळे परिसरातील अनेक शेतकरी या खरिपात बोगस बियाण्यापासून वाचले आहेत.

तालुक्याची स्थिती पाहता, पाच वर्षांपासून या बोगस बियाण्याचा धंदा अधिक फोफावला आहे. बंद असलेल्या किंवा सरकारने ज्या कंपन्यांच्या बियाण्यावर बंदी घातली, अशा कंपनीचे बियाणे तालुक्यात आणणारी टोळीही सक्रिय असल्याची बाब नाकारता येत नाही.

बोगस बियाणे दर वर्षी तालुक्यात येते. त्याची लागवड होते. पूर्वी ते विशिष्ट दुकानांमध्ये मिळायचे. आता तालुक्यातील छोट्या गावांमध्येही त्याचे लोण पसरले आहे. यापूर्वीच्या हंगामात एचटीबीटीच्या नावाखाली अनेक शेतकऱ्यांना बोगस बियाणे विकण्यात आले. पेरलेले न उगवल्याने ते देशोधडीला लागले आहेत.

पोलिस पर्दाफाश करतील का?

अकरा लाखांचे बोगस बियाणे प्रकरणी चालकाला अटक करण्यात आली आहे. या प्रकरणी पोलिस पर्दाफाश करतील का? बियाणे गुजरातमधील बडोदा येथून आणले आहे. यापूर्वी विशेष म्हणजे कमी किमतीत सहज मिळणाऱ्या या बियाण्यांवर कुणाचेही नियंत्रण नाही.

ते येते कुठून आणि कसे, बाजारात ते सहज मिळते तरी कसे, बियाणे कुठून आणले, सारंगखेडा येथील कोणत्या कृषिसेवा केंद्राकडे हे बियाणे उतरणार होते, का कुठे जाणार होते, बोगस बियाण्यात कोण कोण सहभागी आहेत, बोगस बियाण्याच्या रॅकेटचा पर्दाफाश होईल का, असे प्रश्न उपस्थित होत आहेत.

त्याला वेळीच न रोखल्यास अतिवृष्टी आणि दुष्काळापेक्षा भयावह संकट शेतीसमोर उभे राहणार आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Raj Thackeray: राज ठाकरे चोरीच्या मालाचं चुंबन घेतात, ठाकरे गटाने असं का म्हटलं?

Aditya Dhar & Yami Gautam : अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर यामी-आदित्यला पुत्ररत्न; जाणून घ्या बाळाचं नाव आणि त्याचा अर्थ

Maharashtra Lok Sabha 2024 Phase 5 Election Voting LIVE: मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघात शिवसेना-भाजप कार्यकर्ते आमने-सामने

Latest Marathi Live News Update: संसदेची सुरक्षा व्यवस्थेची जबाबदारी आजपासून CISF कडं!

Onion Garlands During Voting: गळ्यात टोमॅटो-कांद्याच्या माळा घालून मतदान; नाशिकमध्ये युवा मतदारांची चर्चा

SCROLL FOR NEXT