Deputy Superintendent of Police Sachin Hire, officers and staff of the search team while showing the bikes seized from the thief. esakal
उत्तर महाराष्ट्र

Dhule Crime: 5 दुचाकींसह चोरट्याला अटक; शिरपूर पोलिसांची कामगिरी

सकाळ वृत्तसेवा

Dhule Crime : शहरातील दुचाकीचोरीचा तपास करताना अट्टल चोरटा पोलिसांच्या हाती लागला. पोलिसांनी कसून विचारणा करताच त्याने चोरलेल्या पाच दुचाकी काढून दिल्या. त्यातील तीन दुचाकींचे गुन्हे उघड झाले. (Thief arrested with 5 bikes Performance of Shirpur Police Dhule Crime)

शहर पोलिस ठाण्याच्या शोधपथकाने ही कामगिरी बजावली. विशाल रणजितसिंह चौधरी (रा. पित्रेश्वर कॉलनी, शिरपूर) यांची होंडा शाइन दुचाकी (एमएच १८, बीटी ५६३७) ७ ऑगस्टला रात्री साडेनऊ ते साडेअकराच्या सुमारास करवंद रस्त्यावरील गौरव हॉटेलसमोरून चोरीस गेली होती.

या गुन्ह्याचा तपास करताना पोलिस निरीक्षक ए. एस. आगरकर यांना शहरातील गुजराथी कॉम्प्लेक्स येथे एक संशयित कमी किमतीत दुचाकी विकत असल्याची माहिती मिळाली. शोधपथकाने त्याला ताब्यात घेतले असता त्याच्याकडे होंडा शाइन दुचाकी आढळली.

संशयित विनोद अशोक कोळी (वय २८, रा. कोठली, ता. शहादा) याला कसून विचारणा केली असता त्याने होंडा शाइन दुचाकी कुकावल (ता. शहादा) येथून चोरल्याची कबुली दिली. शहादा पोलिसांकडे केलेल्या चौकशीत चोरी उघड झाली.

त्यामुळे संशयिताविरोधात गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली. पोलिस कोठडीत असताना विचारपूस केल्यानंतर त्याने शिरपूरसह आणखी काही ठिकाणाहून दुचाकी चोरल्याचे कबूल केले.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

संशयिताने दिलेल्या माहितीवरून कोठली येथील त्याच्या घरी जाऊन पाहणी केल्यानंतर आणखी चार दुचाकी आढळल्या. त्याच्याकडून एकूण पाच दुचाकी हस्तगत करण्यात पोलिसांना यश आले.

त्यात होंडा शाइन ब्रँडच्या तीन, एक होंडा ड्रीम युगा व एक हीरो स्प्लेंडरचा समावेश आहे. या तपासात शहादा, शिरपूर व चोपडा शहर पोलिस ठाण्यातील तीन गुन्हे उघडकीस आले. जप्त मुद्देमालाची एकूण किंमत दोन लाख ७० हजार रुपये आहे.

पोलिस अधीक्षक संजय बारकुंड, अपर अधीक्षक किशोर काळे, पोलिस उपअधीक्षक सचिन हिरे यांच्या नेतृत्वाखाली निरीक्षक ए. एस. आगरकर, शोधपथकाचे हवालदार ललित पाटील, लादूराम चौधरी, पोलिस नाईक रवींद्र आखडमल, मनोज पाटील, विनोद आखडमल, गोविंद कोळी, योगेश दाभाडे, प्रशांत पवार, भटू साळुंके, सचिन वाघ, मनोज दाभाडे, मनोज महाजन, आरिफ तडवी, मिथुन पवार, राम भिल, चेतन भावसार, शरद पारधी यांनी ही कामगिरी बजावली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold Price: महत्त्वाची बातमी! सोन्याच्या किमती १५ ते ३० टक्क्यांनी वाढणार, आश्चर्यकारक अहवाल समोर

Sangli Healthcare Services : जिल्हा नियोजन निधीची मोठी मदत; सांगली-मिरजमध्ये सरकारी आरोग्यसेवेचे ‘मॉडर्न रूप’ MRI, CT, OT सर्व सुविधा एकाच छताखाली!

Marathi Breaking News LIVE: - पनवेल – कळंबोली कोचिंग कॉम्प्लेक्स प्रकल्पांतर्गत अडथळे दूर करण्याच्या कामांसाठी विशेष पॉवर ब्लॉक्स

५८ व्या वर्षीही माधुरी दीक्षितची त्वचा इतकी नितळ कशी? मुळीच चुकवत नाही 'या' तीन गोष्टी; म्हणते- सुंदर दिसण्यासाठी...

Biotin Boost Ladoos केसांच्या वाढीसाठी जबरदस्त! फक्त १० मिनिटांत बनवा हे पौष्टिक 'बायोटिन लाडू'

SCROLL FOR NEXT