Thieves broke the cupboard locker and ransacked it. Fingerprint expert during inspection esakal
उत्तर महाराष्ट्र

Dhule Cime: दोंडाईचात चोरट्यांचा प्रयत्न फसला! चोरट्याने तिसऱ्या मजल्यावरून टाकली उडी पण...

सकाळ वृत्तसेवा

Dhule Cime : येथील सौरभ मंगल कार्यालयाच्या मागे शिववंदना अपार्टमेंटमधील तिसऱ्या मजल्यावर धाडसी चोरी झाली. सोन्या-चांदीच्या दागिन्यांसह ६१ हजार रुपये चोरून नेताना चोरट्यांचा प्रयत्न फसला.

अपार्टमेंटमधील रहिवाशांना जाग आल्याने दोन चोरट्यांपैकी एकाने तिसऱ्या मजल्यावरून उडी टाकल्याने तो जखमी झाला.

पायाला गंभीर दुखापती झाल्याने रहिवाशांनी पोलिसांच्या ताब्यात दिले, तर एक मात्र तुरी देऊन पसार झाला आहे. यामुळे वारंवार होणाऱ्या चोऱ्यांची उकल पोलिसांकडून होईल, अशी चर्चा आता नागरिकांमधून व्यक्त केली जात आहे. (Thief jumps from third floor in robbery at Dondaicha injured in police custody Dhule Cime)

तुषार विकास सारडा (वय २६) या व्यापारी नातेवाइकांकडे धार्मिक कार्यक्रमासाठी पाळधी (ता.जि. जळगाव) येथे गेले होते. सोमवारी (ता. ९) पहाटे चार-साडेचारच्या सुमारास तिसऱ्या मजल्यावर रूम नंबर १४ या बंद घरातील चोरट्यांनी कडीकोयंडा तोडून आता शिरले.

खोलीतील कपाटचे लॉकर तोडून ३४ हजारांची रोख रक्कम व इतर सोन्या चांदीचे दागिन्यांसह ६१ हजार तीनशे रुपयांच्या दोन चोरट्यांनी घरफोडी केली आहे. पिशवीत मुद्देमाल घेऊन पडून जात होते. तोवर शेजारी शरद पवार यांना जाग आली.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

चोर पळून जात असल्याचे पाहिले. अपार्टमेंटमध्ये आरडाओरडा झाला. त्यात राहुलसिंग प्रधानसिंग शिकलकर (रा. नंदुरबार) या चोरट्याने तिसऱ्या मजल्याच्या गच्चीवरून पैशांच्या पिशवीसह खाली उडी टाकली.

त्यात पाय फ्रॅक्चर झाल्याचे प्राथमिक उपचारानंतर पोलिसांनी सांगितले. पुढील उपचारासाठी धुळे येथे चोरट्यास पाठविण्यात आले आहे, तर एक पळून गेला. चोरटे सराईत असल्याचेही पोलिस सूत्रांनी सांगितले. याबाबत दोंडाईचा पोलिस ठाण्यात तुषार विकास सरडा यांनी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs WI, 1st T20I: कॅप्टन श्रेयस अय्यरचं वादळी शतक! भारताचा वेस्ट इंडिजवर ३२ चेंडू राखून दणदणीत विजय, मालिकेत आघाडी

MPSC Student Agitation : अध्यक्षांच्या राजीनाम्यावर आंदोलक ठाम; विद्यार्थ्यांच्या स्वप्नांची काढली प्रतीकात्मक अंत्ययात्रा

Pune Crime : कसबा मंदिरातील दानपेटी फोडली! मध्यरात्री मंदिराचे कुलूप तोडून ६० हजारांची रोकड लंपास; आरोपीला अटक

India New Captain: भारतीय महिला संघाला मिळाली नवी कर्णधार! BCCI ने जाहीर केले ODI अन् T20I संघ, हरमनप्रीतला मिळाली जागा?

Shirur Crime : जागेचा वाद विकोपाला! भाडोत्री शुटर्सनी जागा मालकाऐवजी त्याच्या कामगारालाच घातल्या गोळ्या, कामगाराचा घटनास्थळीच मृत्यु

SCROLL FOR NEXT