Inspector A with seized bike. S. Agarkar and the staff of the search team.  esakal
उत्तर महाराष्ट्र

Dhule Crime News : तो करत होता चक्क चोरीच्या दुचाकीची विक्री OLXवर अन....

सकाळ वृत्तसेवा

Dhule Crime News : दुचाकी चोरीवरच समाधान न मानता थेट ओएलएक्स या ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मवर तिची विक्री करण्याचा प्रयत्न करणाऱ्या युवकाला शहर पोलिसांनी चतुर्भुज केले. त्याच्याकडून आणखी काही दुचाकी चोरीचे गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे.

सखाराम शेनपडू भोई (वय ५२, रा. वर्शी, ता. शिंदखेडा) २७ जूनला कामानिमित्त शिरपूरला आले होते. (thief selling bike on olx arrested dhule crime news)

बसस्थानकासमोर असलेल्या टॅक्सी स्टँड परिसरात गौरव हॉस्पिटलसमोर त्यांनी हीरो एचएफ डीलक्स दुचाकी (एमएच १८, बीटी ६०१०) लावली. अज्ञात संशयिताने तेथून दुचाकी चोरून नेली.

भोई यांच्या फिर्यादीवरून शहर पोलिस ठाण्यात चोरट्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. दरम्यान, पोलिसांना संबंधित चोरीची दुचाकी ओएलएक्स या ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मवर विक्रीसाठी उपलब्ध असल्याची माहिती मिळाली. त्यांना संशयिताचा सुगावा लावला. त्याच्यावर पाळत ठेवली. सोमवारी संशयित दुचाकीची नंबरप्लेट काढून फिरत असताना चोपडा फाटा येथे त्याला ताब्यात घेतले.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

चेसीस व इंजिन क्रमांकावरून दुचाकी चोरीची असल्याचे निष्पन्न होताच त्याला वाहनासह शहर पोलिस ठाण्यात नेण्यात आले. रूपेश युवराज बंजारा (वय १९, रा. अजनाड, ता. शिरपूर) असे संशयिताचे नाव आहे.

या चोरीचा यशस्वी उलगडा केल्याबद्दल पोलिस निरीक्षक ए. एस. आगरकर, शोधपथकाचे हवालदार ललित पाटील, लादूराम चौधरी, पोलिस नाईक मनोज पाटील, विनोद आखडमल, गोविंद कोळी, योगेश दाभाडे, प्रशांत पवार, भटू साळुंखे, सचिन वाघ, मिथुन पवार, राम भिल, चेतन भावसार, शरद पारधी यांचे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी कौतुक केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Warren Buffett: वॉरेन बफेंसारखी गुंतवणूक करायला शिका; कमवाल करोडो रुपये, काय आहे त्यांची स्ट्रॅटेजी?

HBD MS Dhoni: एमएस धोनीच्या नावावर असलेले असे ५ रेकॉर्ड जे मोडणं कोणालाही आहे महाकठीण

Chandrakant Patil: पुणे पोलिस दलात लवकरच एक हजार जणांना घेणार; चंद्रकांत पाटील यांची माहिती

11th Class Admission: अकरावीच्या प्रवेशासाठी आज अखेरची संधी; ३२ हजार विद्यार्थ्यांनी निश्चित केला प्रवेश

Solapur News: 'मुख्यमंत्र्यांसमवेत कल्याणशेट्टी अन्‌ मानेंची चर्चा'; माजी खासदार थांबले काही अंतरावर, नेमकं काय घडलं..

SCROLL FOR NEXT