After the skull worship, the marriage ceremony begins. Marriage during skull worship. esakal
उत्तर महाराष्ट्र

Wedding Season : यंदा विवाहाचे भरगच्च मुहूर्त; विवाहाच्या 61 तिथी

सकाळ वृत्तसेवा

Wedding Season : खानदेशात आषाढी एकादशी ते कार्तिकी एकादशीपर्यंत विवाह बंद असतात. आता विवाहांचा धूमधडाका सुरू झाला आहे. या वर्षी गेल्या वर्षीपेक्षा अधिक विवाह तिथी अधिक आहेत. तब्बल ६१ तिथी आहेत. जानेवारी व फेब्रुवारीमध्ये सर्वाधिक विवाह तिथी आहेत. मे व जूनमध्ये एकही तिथी नसल्याने चाकरमान्यांमध्ये नाराजी राहणार आहे.(this year is great time for marriage dhule news)

खानदेशात कार्तिकी एकादशी झाल्याबरोबर विवाहाचा धूमधडाका सुरू झाला आहे. आतापासून बॅंडपथक, मंगल कार्यालय, केटरर्स आदी बुक होत चालले आहेत. मागील वर्षी रेंगाळलेले विवाह आता डिसेंबरमध्ये होत आहेत. धुळे जिल्ह्यात दुष्काळी परिस्थिती आहे. गेल्या पाच महिन्यांपासून बाजारात मंदी आहे. आता विवाहांना प्रारंभ झाला आहे. परिणामी बाजारात बऱ्याच अंशी तेजी येण्याची आशा व्यावसायिकांमध्ये निर्माण झाली आहे.

नोव्हेंबर ते जुलैपर्यंतच्या लग्नाचे मुहूर्त

नोव्हेंबर : २७, २८, २९

डिसेंबर : ६, ७, ८, १४, १५, १७, २०, २१, २५, २९

जानेवारी : २, ३, ४, ५, ६, ८, १७, २२, २७, २८, ३०, ३१

फेब्रुवारी : १, ४, ६, १२, १३, १४, १७, १८, २६, २७, २८, २९

मार्च : ३, ४, ६, ११, १६, १७, २६, २७, ३०

एप्रिल : १, ३, ४, ५, १८, २०, २१, २२, २३

जुलै : ९, ११, १२, १३, १४, १५

मे व जूनमध्ये करा विवाह बिनधास्त

''या वर्षी विवाह तिथी अधिक आहेत. मे व जूनमध्ये नाहीत. पण विवाहयोग्य वय झाल्यानंतर प्रत्येक दिवस तिथीच असते. तेव्हा मुहूर्त नसताना पुरोहिताच्या साक्षीने विवाह लावण्यास काहीच अडचण नाही.''-दुर्गेश जोशी, पुरोहित, कापडणे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune News : मोठी बातमी! कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी सारसबाग राहणार दोन दिवस बंद

Vaibhav Sooryavanshi Records: १२ षटकार, ५ चौकार! वैभवची Fastest IPL Century हुकली; २९ चेंडूंत ९७ धावांवर OUT; जयसूर्याचा विक्रम मात्र मोडला

Kolhapur LPG Tanker Accident : नागपूर-रत्नागिरी महामार्गावर LPG Gas टँकर पलटी; चालक जागीच ठार, रात्री 10 नंतर 'या' मार्गावरील वाहतूक बंद, पर्यायी मार्ग कोणते?

Shendurwada Crime : अपहरण करून चालकास बेदम मारहाण; वाळुज पोलीस ठाण्यात चौघांविरुद्ध गुन्हा दाखल

Pune Traffic: बकरी ईदनिमित्त पुण्यात गोळीबार मैदान परिसरातील वाहतुकीत बदल; अनेक रस्ते बंद, पर्यायी मार्ग जाहीर

SCROLL FOR NEXT