yeola.
yeola. 
उत्तर महाराष्ट्र

हुतात्माच्या दर्जासाठी जवानाच्या कुटुंबावर आली उपोषणाची वेळ 

सकाळवृत्तसेवा

येवला - कर्तव्यावर असतांना संशायास्पद मृत्यू होऊनही केंद्र शासन व केंद्रीय राखीव दल मानोरी येथील जवान दिगंबर शेळके यांना शहीदाचा दर्जा देण्यास टाळाटाळ करत आहेत. अंत्यसंस्कारापासून ही मागणी सुरु असतांना सातत्याने दुर्लक्ष सुरु असल्याने अखेर कुटुंबासह शहिद पत्नी अनिता शेळके व प्रहारचे कार्यकर्ते नाशिक येथील गोल्फ क्लब मैदान येथे आमरण उपोषणाला बसले आहेत. आमदार बच्चू कडू हे देखील या उपोषनात सहभागी होणार आहे. 

प्रहार जनशक्ती पक्ष व प्रहार शेतकरी संघटनेचे जिल्ह्यातील सर्व पदाधिकारी उपोषणस्थळी दाखल होत आहेत. 

शासनाकडून या कुटुंबावर अन्याय सुरु असून एका जवानाने आपला प्राण गमावला तरी केंद्रीय राखीव दल दखल घेत नसल्याने उपोषणाची वेळ आल्याचे त्यांनी म्हटले आहे. शहीद शेळके हे तेजपूर (आसाम) केंद्रीय राखीव दलाच्या बटालीयन अल्फा कंपनी मध्ये कर्तव्यावर असतांना त्यांचा मृत्यू झाला. हा मृत्यू संशयास्पद असून सबंधित गुन्हेगारांवर गुन्हा दाखल करावा व जवान दिगंबर शेळके यांना शहिद घोषीत करावे, यासाठी हे उपोषण सुरु आहे. मुळात जेव्हा घटना घडली तेव्हापासून हि मागणी केली जात आहे. कुटुंब व गावाने शेळके यांचे पार्थिव देखील ताब्यात घेण्यास नकार दिला होता. तसेच मानोरी येथील ग्रामस्थांनी व परिसरातील गावांनी रास्ता रोको आंदोलने देखील केले होते. त्यावेळी जिल्हाधिकार्यांनी चौकशीचे लेखी आश्वासन दिल्यानंतर सर्व शांत होऊन अंत्यसंस्कार करण्यात आले होते. परंतु, घटनेनंतर पाच महिने होऊनही अद्याप शेळके कुटुंबास न्याय मिळालेला नाही. काही राजकीय पदाधिकार्यांकनी शहिद कुटुंबाची सांत्वनपर भेट घेण्यापलीकडे काहीही घडले नसून शहिदाच्या अस्थी विसर्जनाच्या प्रतिक्षेत आहेत. 

गेल्या महिन्यात येवला दौर्यानवर असलेले आमदार बच्चु कडू यांनी शहिद जवान शेळके कुटुंबाची भेट घेऊन याप्रश्नी सरकार दरबारी आवाज उठविण्याचे आश्वासन दिले होते. मोठे राजकीय नेते, आमदार, खासदार, सत्ताधारी पक्षाचे पदाधिकारी व मंत्री यांनी शेळके कुटुंबाच्या मागणीकडे दुर्लक्ष केले. मात्र, आमदार कडू यांनी जवान शेळके यांना न्याय मिळवून देण्याच्या आंदोलनाची सुत्रे आपल्या हाती घेतली असून या कुटुंबाला पाठींबा देत उपोषणाला आजपासून सुरुवात केली आहे. उपोषण प्रहार जनशक्ती पक्षाचे उत्तर महाराष्ट्र प्रमुख दत्तू बोडके, जिल्हा प्रमुख अनिल भडांगे, शरद शिंदे, प्रहार शेतकरी संघटनचे जिल्हाध्यक्ष प्रकाश चव्हाण, जिल्हा उपाध्यक्ष गणेश निंबाळकर, येवला तालुका प्रमुख हरिभाऊ महाजन, संघटक किरण चरमळ, तालुका उपाध्यक्ष वसंतराव ठाण मांडून आहेत. आज उपोषणाच्या पहिल्या दिवशी आमदार नरेंद्र दराडे यांनी शेळके कुटूंबाची भेट घेतली. निवृत्त मेजर रामदास खटकाळे, विजय मोरे, सचिन खटकाळे, सावळी राम खटकाळे, आदींसह मानोरी येथील ग्रामस्थ उपोषणास बसले आहेत. सैन्य दलात काम केलेल्या जवानांच्या विधवा पत्नीला उपोषण करावे आहे याहून मोठे दुर्दैव नसून न्याय मिळेपर्यंत लढा सुरु ठेवणार असल्याचे प्रहराच्या पदाधिकार्यांनी सांगितले.

केंद्रीय राखीव दलात कर्तव्यावर असतांना संशयास्पद माझ्या पतीचे निधन झाले आहे. आमच्या कुटुंबापासून खूप काहीतरी लपवत जात आहे.सैन्य दलात काम करणाऱ्या पतीचे कर्तव्यावर असतांना निधन होऊनही शहिदाचा दर्जा न मिळणे हा आमच्या कुटुंबावर अन्याय आहे. हा अन्याय व डाग मिटवल्याशिवाय आणि माझ्या पतीला शहिदाचा दर्जा देईपर्यंत लढा सुरुच ठेवेल. 
- अनिता शेळके, शहिद पत्नी

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 RCB vs GT: फाफची दमदार सुरुवात अन् कार्तिकचा फिनिशिंग टच... मधली फळी गडगडली तरी बेंगळुरूची विजयाची हॅट्रिक

Raj Thackeray : ''त्यांना मुख्यमंत्रीपद हवं होतं म्हणून ते मोदींवर टीका करतायत'' कणकवलीतून राज ठाकरेंचा उद्धव ठाकरेंवर निशाणा

Sharad Pawar : 'होय, शरद पवार अतृप्त आत्मा....'; किरण मानेंनी कारकीर्दच मांडली

ISL 2024: मुंबई सिटी ठरले चॅम्पियन! अंतिम सामन्यात मोहन बगानला चारली पराभवाची धूळ

Prajwal Revanna Case : एचडी रेवन्ना एसआयटीच्या ताब्यात; प्रज्ज्वल यांच्याविरोधात CBI कडून ब्लू कॉर्नर नोटीस निघण्याची शक्यता

SCROLL FOR NEXT