Sand thief esakal
उत्तर महाराष्ट्र

Jalgaon Crime News : अवैध वाळूची वाहतूक करताना ट्रॅक्टर पकडले; चालकासह मालकाविरुद्ध गुन्हा

सकाळ वृत्तसेवा

Jalgaon Crime News : गिरणा टाकी परिसरात वाळूचे ट्रॅक्टर खाली करताना तलाठी पथकाने कारवाई केली. ट्रॅक्टर चालकाची विचारपूस करत असताना चालक वाहन सोडून फरारी झाला. याप्रकरणी तलाठ्याने दिलेल्या तक्रारीवरून रामानंदनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. (Tractor caught while transporting illegal sand jalgaon crime news)

शहरातील श्रीधरनगर येथे राहणारे तलाठी राजू कडू बहारे सोमवारी सकाळी अकराच्या सुमारास रामानंदनगर येथून मेहरूणला ड्यूटीवर जात होते. गिरणा टाकी परिसरात (एमएच १८ झेड ७९३२) ट्रॅक्टर व (एमएच १९ एएन ८६५१) क्रमांकाच्या ट्रॉलीतून वाळू खाली करताना दिसले.

तलाठींनी ट्रॅक्टरचालकाला ट्रॅक्टर खाली न करण्यास सांगत त्याची विचारपूस केली. चालकाने त्याचे नाव गणेश अशोक कुंभार (रा. पाळधी) तर ट्रॅक्टर मालक (प्रवीण हिरामण बाविस्कर, रा. निमखेडी) असे सांगत त्यांच्या सांगण्यावरून ट्रॅक्टर चालवत असल्याचे सांगितले.

वाळू कोठून आणली, असे विचारले असता तो उडवाउडवीची उत्तरे देत होता. चालकाची विचारपूस करीत असताना चालकाने ट्रॅक्टर सोडून तेथून पळ काढला. तलाठींनी ट्रॅक्टर रामानंदनगर पोलिस ठाण्यात जमा केला असून, ट्रॅक्टर चालकासह मालकाविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

प्रॉपर्टीची दस्त नोंदणी १५ दिवसांत! तक्रार आल्यास मंडलाधिकाऱ्यांना निकालासाठी तीन महिन्याची मुदत; तक्रारदारास प्रांताधिकाऱ्यांकडे अपिलाचाही अधिकार

आजचे राशिभविष्य - 02 एप्रिल 2026

Ragi Masala Chilla Wrap : झटपट तयार होणारा, पौष्टिक अन् चविष्ट 'रागी मसाला चिला रॅप'; दिवसाची सुरुवात करा एनर्जेटिक नाश्त्याने! लगेच लिहून घ्या सोपी रेसिपी

Panchang : 2 एप्रिल पंचांग विशेष! हनुमान जयंती, पौर्णिमा आणि शुभ मुहूर्त जाणून घ्या

खासगी इंग्रजी शाळांमध्ये मोफत प्रवेश! एप्रिलमध्येच ‘आरटीई’ची लॉटरी; सोलापूर जिल्ह्यात २७८२ जागांसाठी ६ हजार ७०९ विद्यार्थ्यांचे अर्ज, वाचा...

SCROLL FOR NEXT