Between Shahada-Shirpur, traffic congestion and long queues of vehicles caused near Wadal by heavy vehicles.
Between Shahada-Shirpur, traffic congestion and long queues of vehicles caused near Wadal by heavy vehicles.  esakal
उत्तर महाराष्ट्र

Traffic Problem : शहादा-शिरपूर महामार्गावरील काम कासवगतीने

सकाळ वत्तसेवा

Nandurbar News : राज्य महामार्ग क्रमांक सहावरील कोठलीपासून बामखेड्यापर्यंत अपूर्ण असलेल्या कामाचा त्रास वाहधारकांना सहन करावा लागत आहे. या महामार्गावर अवजड वाहनांमुळे होणारी वाहतूक कोंडी नित्याचीच झाल्याचे चित्र दिसून येत आहे. (traffic problem renovation work of state highway is currently going on at very slow speed nandurbar news)

राज्य महामार्गाचे नूतनीकरणाचे काम सध्या कासवगतीने सुरू असून, या कामाला गती देण्याची मागणी परिसरातील नागरिकांमधून होत आहे. शहादा ते शिरपूरदरम्यान अंकलेश्वर बऱ्हाणपूर राज्य महामार्गाचे नूतनीकरणाचे काम तीन टप्प्यांत सध्या सुरू आहे.

गेल्या सहा महिन्यांपासून सुरू असलेल्या कामाला गती मिळेल का, या आशेवर आजवर परिसरातील वाहनधारकांसह नागरिक आहेत. शिरपूर सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारीत येणारे काम तऱ्हाडीपर्यंत पूर्ण झाले असून, अनरदबारी ते हिंगणीपर्यंत काम बऱ्याच ठिकाणी अपूर्णावस्थेत आहे. वडाळी ते बामखेडादरम्यान जर प्रवास केला तर आपण वाहन कोणत्या दिशेने चालवावे, असा प्रश्न वाहनधारकांना निर्माण होतो.

हेही वाचा : संतुलित आहारातून रोखा फॅटी लिव्हरचा आजार

या अपूर्णावस्थेत असलेल्या कामामुळे धुळीचा मोठ्या प्रमाणावर त्रास वाहनधारकांना सहन करावा लागतो, तर सध्या परिसरात बेमोसमी पाऊस पडत असल्याने महामार्गावर जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे. या मार्गावर मोठ्या प्रमाणावर गुजरातमधून अवजड वाहनांची वाहतूक होते. या ठिकाणी वाहतूक कोंडी नित्याचीच ठरलेली आहे. यामुळे खासगी व प्रवासी वाहतुकीचा खोळंबा होतो व वेळही वाया जातो.

एकीकडे गाव व पाड्यावरील रस्ते चकाचक होत असताना शहादा-शिरपूर महामार्गाचे काम कोणत्या कारणामुळे अडले आहे, असा संशय जनतेच्या मनात येत आहे. या राज्य महामार्गाचे भाग्य उजडेल का, असा सवालदेखील उपस्थित होत आहे. उर्वरित काम लवकरात लवकर करावे, अशी मागणी वाहनधारकांसह परिसरातील नागरिकांकडून होत आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Molestation case : राजभवनातल्या तीन अधिकाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल; महिलेच्या आरोपानंतर पोलिसांची मोठी कारवाई

Fact Check: दागिने चोरल्यामुळे पंतप्रधान मोदींना घरातून हाकलण्यात आल्याचा दावा खोटा; वृत्तपत्राचे व्हायरल फोटो खोटे

Dindori Lok Sabha Constituency : गुरुजींसमोर ताईंना राजकीय खिचडी शिजवण्याचे आव्हान; दिंडोरी कांटे की टक्कर

Bibhav Kumar Detained: स्वाती मालीवाल यांच्यावर झालेल्या मारहाणीप्रकरणी केजरीवालांच्या पीएला पोलिसांनी घेतले ताब्यात

Share Market Closing: शेअर बाजार तेजीसह बंद; सेन्सेक्स 74,005 वर, कोणते शेअर्स वधारले?

SCROLL FOR NEXT