Navapur: Supporters along with the candidates of the Transformation Panel showing the victory sign after winning over the sugar factory esakal
उत्तर महाराष्ट्र

Nandurbar News : नवापूर साखर कारखान्यावर परिवर्तन पॅनलचे वर्चस्व

सकाळ वृत्तसेवा

नवापूर : डोकारे (ता. नवापूर ) आदिवासी सहकारी साखर कारखान्याची गेल्या २५ वर्षापासून काँग्रेस पक्षाची एकहाती सत्ता होती. आता पर्यंत पाच पंचवार्षिक निवडणूक बिनविरोध झाल्या. पहिल्यांदाच निवडणूक लागल्याने त्यामध्ये भाजप पुरस्कृत परिवर्तन पॅनलचे सर्वच चौदा उमेदवार विजय झाले.

तर शेतकरी विकास पॅनलचे दोन उमेदवार बिनविरोध तर एक विजयी झाले आहे. तब्बल २५ वर्षानंतर आदिवासी सहकारी साखर कारखान्यामध्ये सत्तांतर झाले आहे. काँग्रेस पुरस्कृत शेतकरी विकास पॅनल पराभूत झाले आहे. (Transformation panel dominates Nagpur Sugar Factory Nandurbar News)

माजी आमदार शरद गावित, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष तथा विद्यमान सदस्य भाजपचे तालुकाध्यक्ष भरत गावित व त्यांच्या समर्थकांनी मतमोजणी केंद्राच्या बाहेर फटाक्यांची आतषबाजी करीत जल्लोष केला.

नवापूर तालुक्यातील डोकारे आदिवासी सहकारी साखर कारखान्याची पंचवार्षिक निवडणुकीची मुदत संपल्याने १७ जागेसाठी निवडणूक घेण्यात आली होती. यासाठी शेतकरी विकास पॅनल व परिवर्तन पॅनलची सरळ लढत झाली. निवडणुकीची मतमोजणी दोन फेरीत १२ टेबलवर करण्यात आली. यात सुरवातीला नवागाव, नवापूर गटातील १२ मतदान केंद्रातील पेटीतील मतपत्रिकेची मोजणी करण्यात आली.

हेही वाचा : Love Jihad: प्रेमाला धर्म आहे...?

आदिवासी सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीमध्ये काँग्रेस पुरस्कृत शेतकरी विकास पॅनलचे १५ उमेदवार तर भाजप पुरस्कृत परिवर्तन पॅनलमध्ये १४ उमेदवार असे दोन्ही गटातील एकूण २९ उमेदवार निवडणुकीचा रिंगणात उभे होते.

पहिल्या फेरीमध्ये शेतकरी विकास पॅनलला परिवर्तन पॅनलने धक्का दिला. तब्बल ११ उमेदवार आघाडीवर होते. तर शेतकरी विकास पॅनलचे चार उमेदवार आघाडीवर होते. कारखान्याच्या संचालकांच्या १७ जागांपैकी शेतकरी विकास पॅनलचे आरिफ बलेसरिया, अजित नाईक हे दोन उमेदवार आधीच बिनविरोध झाले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Teachers Protest : आंबेगाव तालुक्यात शुक्रवारी शिक्षकांचा ‘आक्रोश मोर्चा’; २८२ शाळांतील १,१५० शिक्षक सामूहिक रजेवर!

Pune Crime : नीलेश घायवळचा नंबरकारी अजय सरवदेकडून पिस्तुलासह चारशे काडतुसे जप्त!

Lawrence Bishnoi Vs Goldy Brar : "बनाने वाले मिटाना भी जानते हैं" ; लॉरेन्स बिश्नोई टोळीचा गँगस्टर गोल्डी ब्रारवर पलटवार!

IND vs SA, 2nd ODI: मार्करमचं शतक अन् द. आफ्रिकेचा भारतावर रोमहर्षक विजय! ब्रेव्हिस-ब्रिट्सकेही चमकले; विराट-ऋतुराजची शतके व्यर्थ

Akola Police : २१ दिवसांची धाडसी शोधमोहीम यशस्वी; हरवलेल्या १४ वर्षीय बालकाचा शोध; अकोला पोलिसांची विशेष कामगिरी!

SCROLL FOR NEXT