image आदिवासी विकास.jpg
image आदिवासी विकास.jpg 
उत्तर महाराष्ट्र

'आदिवासी विकास'कडून चक्क 'इतक्या' संस्था काळ्या यादीत!

सकाळवृत्तसेवा

नाशिक : आदिवासी विकासच्या कल्याणकारी योजनेतील अनियमिततेसंबंधीच्या न्यायमूर्ती एम. जी. गायकवाड समितीने सादर केलेल्या चौकशी अहवालात नमूद असलेल्या राज्यातील 105 खासगी पुरवठादार-संस्थांना काळ्या यादीत टाकण्यात आले आहे. त्यामध्ये नाशिकच्या पाच संस्था अन्‌ कंपनीचा समावेश आहे. 

खासगी पुरवठादार आणि संस्थांना सरकारने दारे बंद

मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका 2004-05 ते 2008-09 मधील आदिवासी विकास योजनांच्या संबंधाने दाखल करण्यात आली आहे. उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार राज्य सरकारने न्यायमूर्ती गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली पाच सदस्यांची चौकशी समिती स्थापन केली. या समितीने आदिवासी विकास विभागांतर्गतच्या चार अपर आयुक्त, 28 प्रकल्प कार्यालये, आदिवासी विकास महामंडळाची चौकशी करून अहवाल सरकारला आणि उच्च न्यायालयाला सादर करण्यात आला. समितीच्या शिफारशीमध्ये विभागाच्या योजना अंमलबजावणीमध्ये गैरवापर केल्याचे नमूद करण्यात आले आहे. न्यायालयाने विभागाला वस्तू आणि सेवा पुरविणाऱ्यांना अहवालानुसार काळ्या यादीत टाकण्याचे निर्देश दिले. 


काम नाही मिळणार 

आदिवासी विकास विभागातर्फे आणि अंतर्गतच्या सर्व क्षेत्रीय कार्यालयांतर्फे आदिवासींसाठी राबविण्यात येणाऱ्या कोणत्याही योजनेचे काम देण्यासाठी काळ्या यादीत टाकलेल्या खासगी पुरवठादार आणि संस्थांना सरकारने दारे बंद केली आहेत.
त्यात अकोला, परभणी, नागपूर, अमरावती, वाशीम, चंद्रपूर, पालघर, नागपूर, नंदुरबार, गडचिरोली, वर्धा, रायगड, पुणे, जळगाव, मुंबई, ठाणे, नांदेड, बीड, नगर, कोल्हापूर, सातारा, यवतमाळ जिल्ह्यातील खासगी पुरवठादार आणि संस्थांचा समावेश आहे.  

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Marathi News Live Update: अभिनेते शेखर सुमन यांनी घेतली जेपी नड्डा यांची भेट

Lok Sabha Election 2024 Phase 3 LIVE Updates : दुपारी तीन वाजेपर्यंत देशात 50.71 टक्के मतदान; महाराष्ट्र अजूनही सगळ्यात मागे

Fact Check : कोरोना लसीसंदर्भातील बातम्यांमुळे लस प्रमाणपत्रात बदल करण्यात आले नाहीत; व्हायरल होत असलेला दावा चुकीचा

जम्मू काश्मीरमध्ये सुरक्षा दलांना मोठे यश! चकमकीत लष्करचा प्रमुख बासित अहमद डारसह तीन दहशतवादी ठार

Kushal Badrike : "... ओळखीचे चेहरे अनोळख्या स्टेशनवर निघून जातात"; कुशलने व्यक्त केली खंत

SCROLL FOR NEXT