jaggery for manufacture and sale of jaggery.  esakal
उत्तर महाराष्ट्र

Sakal Exclusive : गुळनिर्मितीतून आदिवासी शेतकरी आत्मनिर्भर; महुबंदला दोन गुऱ्हाळ

भिलाजी जिरे

Dhule News : शेती असो व अन्यत्र मोलमजुरी, काबाडकष्ट करणाऱ्या अनेक आदिवासी बांधवांनी वेगळी वाटही निवडली आहे. (tribal farmers have set up factory for manufacture of Gavran jaggery in their own farm dhule news)

महुबंद (ता. साक्री) येथील आदिवासी शेतकऱ्यांनी स्व- प्रयत्नांती आपल्या शेतीतच गावरान गूळ निर्मितीचा कारखाना (गुऱ्हाळ) उभारला आहे. यातून त्यांना लाखो रुपयांचा फायदा होत आहे. त्यांचे प्रशंसनीय प्रयत्न आदिवासी समाजासह इतर तरुणांसाठीही अनुकरणीय ठरत आहेत.

महुबंद पूर्वी कुडाशी ग्रुप ग्रामपंचायतीत समा‍विष्ट होते. ते २०२१ ला स्वतंत्र ग्रामपंचायत रूपाने अस्तित्वात आले. तेथील गुळाचे गुऱ्हाळ प्रसिद्ध आहे. शिंदे परिवाराचा तो पारंपरिक व्यवसाय आहे. या परिवाराची तिसरी पिढी गूळ निर्मितीच्या व्यवसायात आहे. काबाडकष्ट करूनही उसाला चांगला दर मिळत नसल्यामुळे महुबंद या लहान गावात आदिवासी शेतकऱ्यांनी गूळ निर्मितीचा कारखाना चालविणे वाखाणण्याजोगे आहे.

शिंदेंची तिसरी पिढी

(स्व) सोमा तानाजी शिंदे, नंतर यजमल सोमा शिंदे, श्यामा सोमा शिंदे, शाबा सोमा शिंदे, बाबूलाल सोमा शिंदे, राजमल सोमा शिंदे, गजमल सोमा शिंदे, आता तिसऱ्या पिढीतील हिरामण यजमल शिंदे, प्रवीण गजमल शिंदे, धाकलू बाबूलाल शिंदे यांनी आपल्या शेतातच उसावर प्रक्रियेतून गूळ निर्मिती सुरु केली आहे.

हेही वाचा : संतुलित आहारातून रोखा फॅटी लिव्हरचा आजार

यात त्यांना एक टनपासून सरासरी १०० ते १२० किलो गुळाचे उत्पन्न मिळते. या गुळात कुठल्याही प्रकारचे रसायन मिसळले जात नाही. त्यामुळे गुळाचा दर्जा उत्तम असून त्याला चांगली मागणीही आहे. महुबंद येथे गावरान गुळाची निर्मिती होत असल्याने मागणी चांगली असते.

गरमागरम गुळाचा स्वाद

गुऱ्हाळ उभारताना अनेक अडचणींचा सामना करावा लागल्याचे शिंदे कुटुंबाने सांगितले. ऊस पिळून रस मोठ्या हौदात जमा केला जातो. तेथून तो कढईत उकळून घट्ट केला जातो व गूळ तयार होतो. गोळक्या असलेला कर्मचारी गूळ तयार झाला की नाही ते तपासत असतो.

पसरट हौदात थंड करून गुळाच्या ५, १०, १५, २०, अशा निरनिराळ्या किलोच्या भेल्या तयार केल्या जातात. निर्मिती प्रक्रियेवेळी परिसरात गुळाचा सुगंध दरवळतो. त्यामुळे खवय्ये गरमागरम गुळाचा स्वाद घेतात.

आत्मनिर्भरतेची कास

संबंधित आदिवासी शेतकऱ्यांनी कुणाकडूनही कर्ज घेतलेले नाही. केवळ हिमतीवर त्यांनी आत्मनिर्भरतेची धरलेली कास आदर्शवत आहे. कुडाशीसह परिसरातील ऊस उत्पादक गूळ तयार करण्यासाठी ऊस देतात.

पिंपळनेरच्या पश्चिम पट्ट्यात महुबंद येथे शिंदे परिवाराची दोन गुऱ्हाळे आहेत. त्यामुळे येथे शेतकरी बऱ्यापैकी ऊस घेऊन येतात. गावरान गुळाचा दर सरासरी ६० ते ७० रुपये प्रतिकिलोने विक्री होतो. अनेक वर्षांपासून साक्रीतील पांझरा-कान सहकारी साखर कारखाना बंद असल्याने पश्चिम पट्ट्यातील शेतकरी गुऱ्हाळावर ऊस आणतात. गूळ आरोग्यासाठी लाभदायक असल्याचे सर्वश्रुत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढे होणार MPSCच्या चौकशी आयोगाचे नवे सचिव, शिवेंद्र राजेंची मोठी घोषणा

IND vs WI, 3rd T20I: अभिषेकच्या वादळानंतर अर्शदीपचा अचूक मारा अन् भारताचा वेस्ट इंडिजवर थरारक विजय; मालिकेतही आघाडी

सूर्यदेव तूळ राशीत प्रवेश करताच १२ राशींचं नशिब बदलणार? करिअर, पैसा अन् नात्यांवर कसा होणार परिणाम?

Ranji Trophy: ८ चौकार अन् ३ षटकार... रिंकू सिंगचं खणखणीत नाबाद शतक; टीम इंडियात पुनरागमनासाठी ठोकली दावेदारी

IND vs WI: तिलक वर्माचा ब्रेनफेड मुमेंट... चौकार झाला असं वाटलं अन् झाला विचित्रपद्धतीने रन आऊट; पाहा Video

SCROLL FOR NEXT