While inspecting the liquor stock seized by the city police Superintendent of Police Sanjay Barkund, Deputy Superintendent of Police Sachin Hire, Inspector A. S. Agarkar etc. esakal
उत्तर महाराष्ट्र

Dhule Crime News : महामार्गावर मद्यसाठ्यासह ट्रक जप्त; 55 लाखांचा मुद्देमाल ताब्यात

सकाळ वृत्तसेवा

Dhule Crime News : मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्गावर विदेशी मद्याची चोरटी वाहतूक करणारा ट्रक शहर पोलिसांनी जप्त केला. बुधवारी (ता. २०) सकाळी केलेल्या या कारवाईत ट्रक व मद्य मिळून एकूण ५५ लाख ३७ हजार २८० रुपयांचा मुद्देमाल ताब्यात घेण्यात आला असून, दोन संशयितांना अटक करण्यात आली. (Truck with liquor stock seized on highway shirpur dhule news)

येथील पोलिस निरीक्षक ए. एस. आगरकर यांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे ही कारवाई करण्यात आली. महामार्गावरील शहादा फाटा येथे पोलिसांनी वाहनांची तपासणी सुरू केली. त्यात प्लॅस्टिकच्या रिकाम्या क्रेटने गच्च भरलेला ट्रक (आरजे ११, जीए ६९०६)ची तपासणी केल्यावर मद्याचा उग्र दर्प आला.

संशयावरून पोलिसांनी ट्रक ताब्यात घेऊन शहर पोलिस ठाण्यात नेला. ट्रकमधील क्रेट उतरवून झडती घेतल्यावर मद्याच्या बाटल्यांची खोकी आढळली. मद्यसाठा, रिकामे क्रेट व ट्रक यांची एकत्रित किंमत ५५ लाख ३७ हजार २८० रुपये आहे. चालक रामरूप जाटाब व सहचालक कृष्णकुमार गुर्जर यांना अटक करण्यात आली.

(लोकल ते ग्लोबल लेटेस्ट अपडेट मिळवा सकाळच्या व्हॉट्सअप चॅनेलवर फक्त एका क्लिकमध्ये)

सायंकाळी पोलिस अधीक्षक संजय बारकुंड यांनी शहर पोलिस ठाण्यास भेट देऊन कारवाईची माहिती घेतली. पोलिसांच्या कामगिरीचे कौतुक करून त्यांनी दहा हजार रुपयांचे पारितोषिक जाहीर केले. संशयितांनी मद्यसाठा पंजाबमधून घेतला असून, गुजरातमध्ये विक्रीसाठी नेण्याचा प्रयत्न असल्याचे प्रथमदर्शनी निष्पन्न झाले.

पोलिस अधीक्षक संजय बारकुंड, अपर अधीक्षक किशोर काळे, पोलिस उपअधीक्षक सचिन हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक ए. एस. आगरकर, उपनिरीक्षक गणेश कुटे, संदीप मुरकुटे, संदीप दरवडे, शोधपथकाचे हवालदार ललित पाटील, रवींद्र आखडमल, योगेश दाभाडे, मनोज दाभाडे, गोविंद कोळी, विनोद आखडमल, प्रशांत पवार, सचिन वाघ, भटू साळुंके, आरिफ तडवी, मनोज महाजन, विवेकानंद जाधव, दीपक खैरनार, भूपेश गांगुर्डे यांनी ही कारवाई केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Eknath Shinde: अस्वस्थ एकनाथ शिंदेंची अमित शाहांकडे नाराजी? थेट मुद्द्यालाच हात घातल्याची माहिती; इकडे फडणवीस-पवारांची गुप्त बैठक

Ayurvedic Kadha for Winter: थंडीमुळे सर्दी-खोकला आणि अंगही खाजतंय? 'हा' आयुर्वेदीक काढा आहे सुपर इफेक्टिव्ह!

Pune Cold : पुण्यात सलग तीन दिवस १० अंश सेल्सिअसपेक्षा कमी तापमानाची नोंद

Fact Check: बिबट्या खरंच रणजी ट्रॉफी सामन्यावेळी धरमशाला स्टेडियममध्ये घुसला? जाणून घ्या Viral Video मागचं सत्य

Akola Crime : अल्पवयीन चोरट्याकडून २१.७५ लाखांचा मुद्देमाल जप्त; घरफोडी प्रकरणाचा वेगवान उलगडा

SCROLL FOR NEXT