truck accident.jpg
truck accident.jpg 
उत्तर महाराष्ट्र

खड्डा चुकविण्याच्या नादात जीव खड्डयात..

दिपक खैरनार : सकाळ वृत्तसेवा

नाशिक : येथील औरंगाबाद अहवा राज्यमार्गावरील अंबासन फाट्यानजीक नामपूरहून येणारा वाळूने भरलेला ट्रक, खड्डा चुकविण्याच्या नादात मजुरवर्ग घेऊन जाणा-या ट्रॅक्टरवर धडकल्याने बारा मजूर जखमी झाल्याची घटना घडली. हा अपघात मंगळवारी (ता.२२) सकाळी सातच्या सुमारास घडला. जखमींना स्थानिक शेतक-यांनी तातडीने नामपूर येथील ग्रामीण रूग्णालयात दाखल केले. त्यानंतर रूग्णालयात प्रथमोपचार करून मालेगाव येथील सामान्य रुग्णालयात हलविण्यात आले आहे.

 बारा परप्रांतीय मजूर जखमी
 गाव व परिसरातील रस्त्यावर पावसामुळे खड्डेच खड्डे पडल्याने वाहनचालकांना खड्डा चुकविण्यासाठी दमछाक उडत आहे. रावळगाव (ता.मालेगाव) येथे मजुरी कामासाठी काही परप्रांतीय उतरले असून ठेकेदारामार्फत नामपूर परिसरात मजूरांचे वीज वितरणचे काम सुरू आहे. नेहमीप्रमाणे मजूर एका ट्रॅक्टरवर बसून नामपूरच्या दिशेने जात असताना औरंगाबाद अहवा राज्यमार्गावरील अंबासन फाट्यावर नामपूरच्या दिशेने वाळूने भरलेला ट्रक (क्र.एमएच४१,जी७३९७) पुलाजवळ खड्डा चुकविण्याच्या नादात थेट ट्रॅक्टरच्या ट्राॅलीवर धडकला. सुदैवाने कुठलीही जीवितहानी झाली नसली तरी या ट्रॅक्टरवर बसलेल्या बारा मजुर जखमी झाले आहेत. अपघाताचा आवाज परिसरातील शेतक-यांच्या कानावर पडताच स्थानिक शेतक-यांनी अपघातस्थळी धाव घेतली. जखमींना तातडीने नामपूर येथील ग्रामीण रूग्णालयात दाखल केले. ग्रामीण रूग्णालयात वैद्यकीय अधिका-यांनी प्रथमोपचार करून पुढिल उपचारासाठी जखमींना रुग्णवाहिकेतून मालेगाव येथील सामान्य रुग्णालय हलविण्यात आले आहे. 

ट्रॅक्टर चालकामुळे वाचले प्राण
ट्रकचालक खड्डा चुकविण्याच्या नादात ट्रॅक्टर धडकणार अशी काहीशी चुणूक ट्रॅक्टरचालकास झाली होती. टॅकर चालकाने सतर्कतेने ट्रॅक्टरचे तोंड रस्त्याच्या कडेला नेले यामुळे खड्ड्याच्या बाजूने आलेल्या ट्रकने थेट ट्राॅलीला धडक देऊन थेट रस्त्याच्या बाजूकडील नालीत गेला. यामुळे आमचे प्राण वाचल्याचे जखमींनी 'सकाळ'ला सांगितले. खड्ड्यांमुळे अपघात झाल्याचे प्रत्यक्षदर्शींनीनी यावेळी सांगितले. 

जखमींची नावे

बौद्धी सिबू मोहंती (वय२५), सनिचर रामा तुडू (वय४०), हिरामण श्रीदुखन मोहंती (वय४०), महादेव सोनाराम मांझी (वय६०), अनिल भिलचंद तुडू (वय२०), मुरली रूपला मोहंती (वय३५), चदंर बिरासाई अग्रई (वय४५), उल्हास घनश्याम मोहंती (वय४५), राजेश दिबूलाल मांझी (वय१८), कामेश्वर टिकोचंद मोहंती (वय४०), हरजीत झुटन मोहंती (वय३९), भिम दुखन मोहंती (वय५०) सर्व राहणार झारखंड 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune School: स्कॉरलशीपची परीक्षा पास पण शाळा निकालच देईनात; महापालिकेचा भोंगळ कारभार

MI Playoff Scenario : 8 सामने हरल्यानंतरही मुंबई इंडियन्स प्लेऑफमध्ये जाऊ शकते का? समजून घ्या समीकरण

Sharad Pawar on Narendra Modi: नरेंद्र मोदींनी कुठं कुटुंब सांभाळलं... शरद पवारांचा पलटवार! नेमकं काय म्हणाले?

Raj Thackeray: शोले, गांधी अन् शक्ती.. राज ठाकरेंना कसं लागलं चित्रपटांचं वेड? बिग बींच्या 'त्या' सीनबद्दल म्हणाले...

शक्तिपीठ महामार्ग : पश्चिम महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या मनात खदखद का आहे?

SCROLL FOR NEXT