crime esakal
उत्तर महाराष्ट्र

Dhule Crime News : गांजा तस्करी करताना गुजरातच्या दोघांना अटक

सकाळ वृत्तसेवा

Dhule Crime News : शिरपूर बसस्थानकातून तस्करीद्वारे गुजरातमध्ये गांजा घेऊन जाण्याच्या प्रयत्नात दोन युवकांना शहर पोलिसांनी अटक केली. २८ नोव्हेंबरला रात्री केलेल्या या कारवाईत दोन युवकांना अटक केली असून, दोघेही गुजरातमधील रहिवासी आहेत.(Two arrested from Gujarat while smuggling ganja dhule crime news)

शहर पोलिस ठाण्याचे निरीक्षक ए. एस. आगरकर यांना शहरातील बसस्थानकातून गांजाची तस्करी सुरू असल्याची माहिती मिळाली होती. त्यांनी सहकाऱ्यांसह बसस्थानक परिसराची टेहळणी केली असता दोन युवक संशयास्पद हालचाली करताना आढळले. दोघांच्या खांद्यावर बॅगा होत्या.

बॅगेत काय आहे, अशी विचारणा केल्यानंतर त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. पोलिसांचा संशय बळावल्याने त्यांनी संशयितांना ताब्यात घेऊन पोलिस ठाण्यात आणले. बॅगच्या झडतीत १२ किलो ८४० ग्रॅम ओलसर गांजा आढळला. गांजासह पोलिसांनी संशयितांचे मोबाईलही जप्त केले.

संशयित हुसेन मोहम्मद नागानी (वय १९, रा. गोंडल, जि. राजकोट, गुजरात) व सुनील तथा किरण भावेशभाई सियाल (१९, रा. लोहानगर, राजकोट, गुजरात) यांना अटक करून त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

पोलिस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर अधीक्षक किशोर काळे, उपविभागीय पोलिस अधिकारी सचिन हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक ए. एस. आगरकर, उपनिरीक्षक संदीप दरवडे, हवालदार ललित पाटील, पोलिस नाईक ललित पाटील, रवींद्र आखडमल, गोविंद कोळी, मनोज महाजन, प्रशांत पवार, भटू साळुंखे, सचिन वाघ, मनोज दाभाडे, विवेकानंद जाधव, दीपक खैरनार यांनी ही कारवाई केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune News : बळकावलेल्या जमिनींपासून बंदूकीच्या गोळ्यांपर्यंत! पुणे पोलिसांनी निलेश घायवळभोवती आवळला फास, घरावर छापेमारी, हाती लागलं मोठं घबाड

योजनांना पात्र, तरीही कर्ज मिळेना; उपचाराअभावी मुलगा गमावला, चित्रकार मंत्रालयासमोर करणार 'अर्ध नग्न लक्षवेधी चित्र' आंदोलन

Latest Marathi News Live Update : पूर्व विदर्भात विजांसह पावसाचा अंदाज; उत्तर महाराष्ट्र, मराठवाड्यात तुरळक ठिकाणी विजांसह पावसाची शक्यता

Coldrif Syrup : मध्य प्रदेश-राजस्थानमध्ये मृत्यूंनंतर 'कोल्ड्रिफ सिरप'वर महाराष्ट्रात बंदी

Raju Shetti:'अन्यथा मुख्यमंत्र्यांना दिवाळी करू देणार नाही': माजी खासदार राजू शेट्टी; शेतकऱ्यांवर गंभीर संकट, मुख्यमंत्र्यांकडून दिशाभूल

SCROLL FOR NEXT