POLICE 1.jpg
POLICE 1.jpg 
उत्तर महाराष्ट्र

अरेच्चा! इथे तर पोलिसांनाच धक्काबुक्की... 

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : सातपूरला हॉटेलमध्ये दारू प्यायल्यानंतर पैसे न देताच निघणाऱ्यास हटकल्याचा राग येऊन मद्यपीने हॉटेलच्या व्यवस्थापकाला मारहाण केली. घटनास्थळी पोचलेल्या पोलिसांशी वाद घालत पोलिसांनी मोबाईलमध्ये शूटिंग केले असता मद्यपीने तो फोडला. डोके फोडून घेत पोलिसांना धमकी दिली. दुसऱ्या घटनेत द्वारका चौकात नो-पार्किंगमध्ये पार्क केलेल्या ट्रॅव्हलचालकाने वाहतूक पोलिसांशी वाद घातला. 

दोन वेगवेगळ्या घटनांत पोलिसांना धक्काबुक्की ; सातपूरमध्ये मद्यपीचा गोंधळ 

सातपूर औद्योगिक वसाहतीत श्‍यामसुंदर हॉटेल आहे. या हॉटेलमध्ये शनिवारी (ता. १०) संशयित योगेश हिरे (वय ४०) दारू प्यायला. त्यानंतर पैसे न देताच तो जाऊ लागला. त्या वेळी हॉटेलचे व्यवस्थापक तफनकुमार शिवप्रसाद साव यांनी बिलाच्या पैशांची मागणी करताना, यापूर्वीही पैसे न देता गेल्याची विचारणा केली. त्याचा राग येऊन संशयित योगेश हिरे याने शिवीगाळ करीत मारहाण केली. व्यवस्थापकाच्या अंगावरील कपडे फाडून हॉटेलच्या गल्ल्यातून ५०० रुपये बळजबरीने काढून घेत ठार करण्याची धमकी दिली. या वादाची माहिती तत्काळ सातपूर पोलिसांना कळविली. हवालदार सूर्यवंशी व जावेद खलील शेख घटनास्थळी पोहचले. या वेळी पोलिस कर्मचारी शेख यांनी संशयिताला समजावून सांगत असतानाही त्याचा गोंधळ सुरूच होता. त्या वेळी हवालदार सूर्यवंशी यांनी मोबाईलमध्ये संशयिताचे चित्रण केले असता, संशयिताने हवालदार सूर्यवंशी यांच्या हातातील मोबाईल हिसकावून आपटून फोडला.

"तुमची नोकरीच घालवितो' असे म्हणून धमकीही

त्यानंतर संशयिताने स्वत:चे डोके फरशीवर आपटून घेतले आणि "तुमची नोकरीच घालवितो' असे म्हणून धमकीही दिली. या प्रकरणी सातपूर पोलिसांत हॉटेलचे व्यवस्थापक तफनकुमार साव यांच्या फिर्यादीनुसार जबरी चोरी, मारहाणीचा गुन्हा, तर पोलिस जावेद शेख यांच्या फिर्यादीनुसार सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला. 

वाहतूक पोलिसाची पकडली कॉलर 
वाहतूक पोलिस भूषण सूर्यवंशी यांच्या फिर्यादीनुसार, शनिवारी (ता. १०) दुपारी तीनच्या सुमारास द्वारका सर्कल येथील पंजाब हॉटेलसमोर संशयित दत्ता गायकवाड (वय ४१, रा. विजयनगर, औरंगाबाद नाका) याने ट्रॅव्हल बस नो पार्किंगमध्ये पार्क केली. त्या वेळी सूर्यवंशी यांनी नो-पार्किंगमधून बस काढून घेण्यास सांगितले. त्याचा राग येऊन संशयित गायकवाडने त्यांच्याशी वाद घालून वर्दीची कॉलर पकडून धक्काबुक्की करीत शिवीगाळ केली. या प्रकरणी मुंबई नाका पोलिसांत सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला.  

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sharad Pawar on Baramati: बारामती लोकसभेचा निकाल कसा दिसतो? शरद पवार म्हणतात, आजपर्यंत...

SRH vs RR IPL 2024 : शेवटच्या चेंडूवर भूवीने हैदराबादला मिळवून दिला विजय

Hemant Savara: पालघरचा तिढा अखेर सुटला! हेमंत सावरांना महायुतीकडून उमेदवारी जाहीर

Udayanraje Bhosale : साताऱ्यातून उमेदवारी जाहीर करायला भाजपला इतका वेळ का लागला? उदयनराजे भोसलेंनी स्पष्टच सांगितलं; पाहा Exclusive Interview

Rohit Sharma Rinku Singh : पत्रकार परिषदेनंतर रोहित रिंकूला भेटला; केकेआरनं केलं ट्विट

SCROLL FOR NEXT