accident sakal
उत्तर महाराष्ट्र

Dhule Accident News : आयशरच्या धडकेत बभळाज येथे दोघे ठार

सकाळ वृत्तसेवा

Dhule Accident News : भरधाव जाणाऱ्या आयशरने धडक दिल्याने दुचाकीवरील दोन जणांचा मृत्यू झाल्याची घटना रविवार (ता. ८) दुपारी एक ते दीडच्या सुमारास घडली.

बभळाज गावालगतच शिरपूरकडून चोपड्या कडे भरधाव जाणाऱ्या आयशर (जीजे २३, एडब्ल्यू ८०९०)ने दुचाकीला जोरदार धडक दिल्याने दुचाकीवरील नारायण हिरामण राठोड (वय ४०, रा. बभळाज) व संतोष खिमा राठोड (२५, रा. अजनाड) हे दोघेही गंभीर जखमी झाले. (Two killed in Eicher collision at Babhlaj dhule accident news)

घटना गावाजवळच घडल्याने नागरिकांनी तत्काळ धाव घेऊन जखमींना उपजिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले. दरम्यान, डॉक्टरांनी संतोष राठोड यास मृत घोषित केले, तर नारायण राठोड याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.

मृत नारायण राठोड बभळाज येथील रहिवासी असून, तो सर्वसाधारण कुटुंबातील ऊसतोड मजूर होता. ऊसतोडणीचे बेणे घेऊन आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवत होता. दरम्यान, दसरा संपताच आपल्या परिवारासह ऊसतोडणीसाठी बाहेरगावी जाणार होता.

कुटुंबातील कर्ता पुरुष गेल्याने राठोड परिवारावर शोककळा पसरली आहे घटनेची नोंद थाळनेर पोलिसांत झाली असून, भटू लालू जाधव यांच्या फिर्यादीवरून आयशरचालक मोहम्मदादिल यासीनभाई वोहरा (२५) याच्यावर गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते. थाळनेर पोलिस तपास करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Supreme Court: न्यायव्यवस्थेवर टीका करण्यास आक्षेप नाही, पण... सर्वोच्च न्यायालयाचा इशारा, दिली कौतुकास्पद शिक्षा

सगळीकडे 'डाइनिंग विद द कपूर्स'ची चर्चा पण शोमधून आलिया भट्ट गायब; राज कपूर यांच्या नातवाने सांगितलं कारण

Nitish Kumar oath ceremony : नितीशकुमार आज बिहारच्या मुख्यमंत्रिपदाची दहाव्यांदा शपथ घेणार, मोदींची 'ग्रँड एन्ट्री' होणार!

दुर्दैवी घटना ! 'काशीळमधील अपघातात ट्रकचालक ठार'; राष्ट्रीय महामार्गाच्या कामाबाबत रास्ता रोको, चाकच अंगावरून गेलं अन्..

Face Yoga Exercises: हिवाळ्यात चमकदार त्वचा हवी? मग रोज 'फेस योगा' करा!

SCROLL FOR NEXT