A motorcycle crushed under a truck & Sunil Gavit esakal
उत्तर महाराष्ट्र

Nandurbar Accident News: धुळे-सुरत राष्ट्रीय महामार्गावर अपघातात दोघे ठार, एक गंभीर जखमी

सकाळ वृत्तसेवा

Nandurbar Accident News : धुळे-सुरत राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहा विसरवाडी सरपणी नदीच्या पुलाच्या उतारावर ट्रकने धडक दिल्याने मोटारसायकलवरील एकाचा जागीच, तर एकाचा ग्रामीण रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला.

एका गंभीर जखमीला जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी पाठविण्यात आले. ही घटना सोमवारी (ता. १६) दुपारी अडीचच्या सुमारास घडली. (Two killed one seriously injured in accident on Dhule Surat National Highway Nandurbar News)

धुळे-सुरत राष्ट्रीय महामार्गावर विसरवाडी गावाच्या पुलाच्या उतारावर धुळ्याकडून सुरतकडे जाणार ट्रक (टीएन ५२, एल ९८२०) व मोटारसायकल (एमएच १८, क्यू ९७११)च्या अपघातात सुनील वसंत गावित (वय ३८, रा. उचीमौवली, ता. नवापूर) याचा जागीच, तर अनोळखी व्यक्तीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.

तिसऱ्याला गंभीर अवस्थेत येथील जिल्हा ग्रामीण रुग्णालयात हलविण्यात आले. भीषण धडकेत मोटारसायकलचा चक्काचूर झाला असून, मोटारसायकलवरील दोघांचा मृत्यू झाला.

घटनास्थळी सहाय्यक पोलिस निरीक्षक प्रकाश वानखेडे यांच्यासह पोलिस पथकाच्या मदतीने येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. ट्रकचालक फरारी आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Delhi Crime: शहर हादरलं! एकाच कुटुंबातील चौघांचे मृतदेह घरात आढळले; मृत्यू कशामुळे?

Mumbai News: डोंबिवलीत रस्त्यांची चाळण! नागरिकांचा संताप, प्रशासनाविरोधात रिक्षाचालकांचा ठिय्या

Nashik News : पावसामुळे रस्त्यांची दुर्दशा: सातपूर-अंबड MIDC मधील खड्डेमय रस्ते; कामगार आणि उद्योजक त्रस्त

मराठी बोलणार नाही म्हणणाऱ्या केडियांनी मागितली माफी, चूक सुधारणार म्हणत राज ठाकरेंना केली नम्र विनंती; पाहा VIDEO

मराठीसाठी सत्तेवर लाथ, Raj Thackeray यांनी सांगितला 'तो' प्रसंग । Uddhav Thackeray । Raj Thackeray

SCROLL FOR NEXT