Death esakal
उत्तर महाराष्ट्र

Dhule Crime News: वसतिगृहातील मुलीसह दोघांची गळफासाने आत्महत्या

सकाळ वृत्तसेवा

Dhule Crime News: पिंपळगाव खुर्द (ता. साक्री) येथील दोघांनी जांभोरे गावातील जंगलात झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना रविवारी (ता. १) सायंकाळी उघडकीस आली. (Two people committed suicide dhule crime news)

शासकीय आदिवासी मुलींच्या वसतिगृहातील बारावीमधील रंजना रोडू चौरे (वय १८, रा. पिंपळगाव खुर्द) ही विद्यार्थिनी तीन-चार दिवसांपूर्वी शाळेत जाण्यासाठी निघाली. मात्र, ती परतली नाही.त्यामुळे वसतिगृहातून विद्यार्थिनीच्या पालकांना फोन करण्यात आला.

पण रंजना घरीही आली नसल्याने वडिलांनी तिचा शोध सुरू केला. तिचा तपास सुरू असताना त्यांना जांभोरे गावाच्या पोलिसपाटलांमार्फत रविवारी दुपारी दोनच्या सुमारास माहिती मिळाली, की पिंपळगाव गावातील मुलगा व मुलीने जांभोरे गावातील जंगलात झाडाला गळफास घेतला आहे.

दोघांना साक्री ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात केले असता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.

रंजनासोबत गळफास घेतलेल्या तरुणाचे नाव विलास भाल्या गांगुर्डे (वय २५, रा. पिंपळगाव खुर्द) असल्याचे सांगण्यात आले. दोघे झाडाला गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळले. त्यांच्या आत्महत्येमागचे कारण समजू शकले नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT