Vehicles impounded at Nimgul (Ta.Shindkheda) esakal
उत्तर महाराष्ट्र

Dhule News : निमगूळ येथे कत्तलखान्याकडे गायी वाहून नेणारी वाहने जप्त

सकाळ वृत्तसेवा

निमगूळ : येथील गावाजवळ खेतियाकडून येणाऱ्या पिक-अप (एमएच ०४, एफपी १९६७०) व टाटा एसएस (एमएच ३९, सी ९३५५) या दोन्ही वाहनांमध्ये १३ गायींना शुक्रवारी (ता. २४)

सकाळी आठच्या सुमारास आद्य गोरक्षण जनआंदोलन शिवछत्रपती दोंडाईचा विभाग धुळे यांच्या कार्यकर्त्यांनी या दोन गाड्या निमगूळ येथे मिळालेल्या माहितीवरून ताब्यात घेतल्या. (Two vehicles carrying cows to slaughterhouse seized at Nimgul Dhule News)

पिक-अपचा चालक पळून गेला, तर टाटा एस गाडीचा चालक- मालक मधुकर रामदास लोंढे (रा. शिंदखेडा) याला ताब्यात घेतले असून, ही गुरे कत्तलखान्यात जात असल्याची प्राथमिक माहिती मिळाली.

त्यानुसार दोंडाईचा पोलिस ठाण्यात घटनेची माहिती दिली.पोली उपनिरीक्षक शरद लेंडे व सुनील शिंदे यांनी निमगूळ येथे घटनास्थळी भेट देऊन दोन्ही गाड्या ताब्यात घेऊन पोलिस ठाण्यात जमा केल्या.

या वेळी निमगूळ येथील चंद्रकांत चौधरी, अमोल मधुकर बागल, योगेश माधवराव बागल, नगीन कोळी, लालू बागल, तोशिब बागल यांच्यासह तरुणांनी मदत केली. याबाबत दोंडाईचा पोलिसांत गुन्हा नोंद केला असून, उपनिरीक्षक शरद लेंडे तपास करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PAKISTAN SEMIS SCENARIOS : न्यूझीलंड हरला, म्हणून पाकड्यांनी जास्त फडफडू नये! उपांत्य फेरीचं समीकरण पाहताच येईल चक्कर...

T20 WC, NZ vs ENG : इंग्लंडने बाजी मारली, पाकिस्तानच्या जीवात जीव आला! न्यूझीलंड पराभूत होऊनही पोहचू शकतात उपांत्य फेरीत

Reliance Group: अंबानींच्या सून राधिका मर्चंट पैठणमध्ये! तीन महिन्यात दुसरा दौरा; पोलिस बंदोबस्तात प्रकल्पाला दिली भेट

Accident : सिंदखेड फाट्यावर दुचाकी चारचाकीची भीषण धडक; एक महिला ठार, एक जखमी

Mount Abu Name Change : जगप्रसिद्ध 'माउंट अबू'सह तीन शहरांचे नामांतर; मुख्यमंत्री भजनलाल शर्मा यांची मोठी घोषणा

SCROLL FOR NEXT