Two years imprisonment for fake doctor dhule news esakal
उत्तर महाराष्ट्र

Dhule Fake Doctors : बोगस डॉक्टरला 2 वर्षे कारावास

बोगस वैद्यकीय व्यवसाय प्रकरणी धुळे मुख्य न्यायदंडाधिकाऱ्यांनी एका बोगस डॉक्टरला दोन वर्षे कारावास व दंडाची शिक्षा सुनावल्याने बोगस डॉक्टरांचे धाबे दणाणले आहे.

सकाळ वृत्तसेवा

Dhule Fake Doctors : बोगस वैद्यकीय व्यवसाय प्रकरणी धुळे मुख्य न्यायदंडाधिकाऱ्यांनी एका बोगस डॉक्टरला दोन वर्षे कारावास व दंडाची शिक्षा सुनावल्याने बोगस डॉक्टरांचे धाबे दणाणले आहे. (Two years imprisonment for fake doctor dhule news)

धुळ्यातील शहर पोलिस ठाण्यातील पोलिसांनी जुलै २०१८ मध्ये धुळ्यातीलच साक्री रोड, रिमांड होमजवळ साई समर्थ क्लिनिक येथे छापा टाकून बोगस वैद्यकीय व्यवसाय करणाऱ्या संशयित संजय शांताराम महाले यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला होता.

तपासणी होऊन न्यायालयात आरोपपत्रही दाखल झाले. त्यात संशयित दोषी ठरून मुख्य न्यायदंडाधिकारी वैभव कुलकर्णी यांनी महाराष्ट्र वैद्यकीय व्यवसाय अधिनियमानुसार संशयित महाले यास दोन वर्षे सश्रम कारावास व दोन हजार रुपये दंड आणि दंड न भरल्यास दोन महिने साध्या कैदेची शिक्षा.

तसेच भारतीय दंडविधानाच्या एका कलमानुसार पुन्हा सहा महिने सश्रम कारावास व दोन हजार रुपये दंड व दंड न भरल्यास दोन महिने साध्या कैदेची शिक्षा ठोठावली. खटल्यात सहाय्यक सरकारी वकील राकेश प्र. चौधरी यांनी आठ साक्षीदार तपासले.

उच्च व सर्वोच्च न्यायालयाचे निवाडे दाखल करून सरकार पक्षाची बाजू भक्कमपणे मांडली. त्यांना सहाय्यक संचालक व सरकारी अभियोक्ता संजय मुरक्या यांचे मार्गदर्शन लाभले.

शहर पोलिस ठाण्याचे तपास अधिकारी हवालदार रवींद्र बेडसे व पोलिस निरीक्षक आनंद कोकरे यांचे सहकार्य लाभले. दरम्यान, अनेकदा गुन्हे दाखल होऊनही पुन्हा त्याच गावी व ठिकाणी अनेक वर्षांपासून अनधिकृत वैद्यकीय व्यवसाय करणाऱ्या बोगस डॉक्टरांचे या निकालाने धाबे दणाणले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

नेते अन्‌ कार्यकर्त्यांनो सावधान ! 'साेलापुरात बाईक रॅली काढाल तर गुन्हा दाखल'; पोलिस आयुक्तांचे काय आहेत नियम?

Solapur News: 'साेलापूर जिल्ह्यातील ७८ हजार शेतकऱ्यांचे फार्मर आयडी प्रलंबित'; शेतकऱ्यांना अतिवृष्टी भरपाई मिळेना..

Tamhini Ghat Accident एकमेकांचे जिवलग मित्र… मिळून थार घेतली; ताम्हिणी घाटात मृत्यूमुखी पडलेल्या तरुणांची हृदयद्रावक करुणकथा

ऊसतोड मशीनमध्ये सापडून महिलेचा दुर्दैवी अंत; संक्रट्टी कुटुंबावर कोसळला दुःखाचा डोंगर, हा भयंकर अपघात पाहून...

Pune News : काय सांगता? पुण्यात नगरसेवक पदासाठी चक्क १ कोटीची बोली...नेमका कुठं घडला प्रकार?

SCROLL FOR NEXT