Staff evacuating trapped cows in an ambulance
Staff evacuating trapped cows in an ambulance esakal
उत्तर महाराष्ट्र

Dhule Crime News : जनावरांच्या तस्करीसाठी रुग्णवाहिकेचा वापर..! दोघांना अटक

सकाळ वृत्तसेवा

शिरपूर : भरधाव जाणारी रुग्णवाहिका पोलिसांनी अडविली. तिच्यातील रुग्ण गंभीर आहे का, अशी विचारणा केली आणि चालकाची बोबडी वळली. रुग्णवाहिकेचे मागील दार उघडल्यावर पोलिसांनाही आश्चर्याचा धक्का बसला.

एकूण दहा गायी दाटीवाटीने कोंबलेल्या होत्या. त्यांची सुटका करून गोशाळेत रवाना करण्यात आले. (Use of ambulances for animal smuggling dhule crime news)

सांगवी (ता. शिरपूर) पोलिस ठाण्याच्या पथकाने मंगळवारी (ता. १६) सकाळी जनावरांची तस्करी करणारी रुग्णवाहिका ताब्यात घेतली.

दहा गायींची तस्करी केल्याच्या संशयावरून चालक विजय प्रल्हाद चव्हाण व विक्रम बाळाराम चव्हाण (दोघे रा. महू, जि. इंदूर, मध्य प्रदेश) यांना अटक करण्यात आली. पोलिस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी जनावरांच्या तस्करीविरोधात कठोर मोहीम हाती घेतल्यानंतर सीमेपलीकडून होणाऱ्या तस्करीवर मोठ्या प्रमाणात नियंत्रण राखणे शक्य झाले आहे.

त्यामुळे तस्करांकडून नवनवीन युक्ती-प्रयुक्तींचा वापर सुरू असल्याचे या कारवाईने दिसून आले. सांगवी पोलिस ठाण्याचे सहाय्यक निरीक्षक सुरेश शिरसाट यांना जनावरांची तस्करी सुरू असल्याची माहिती मिळाली होती.

त्यांनी मंगळवारी पहाटे महामार्गावर हाडाखेड (ता. शिरपूर) येथील गुरुद्वारासमोर सापळा रचला होता. संशयित वाहनाला (एमपी ०९, बीए ०९८१) थांबवून चालकाला आत कोण आहे याबाबत विचारले असता त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यामुळे झडती घेऊन पोलिसांनी दहा गायींची सुटका केली.

पोलिस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर अधीक्षक किशोर काळे, डीवायएसपी सचिन हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक निरीक्षक सुरेश शिरसाठ, सहाय्यक उपनिरीक्षक जयराज शिंदे, रफिक मुल्ला, कैलास जाधव, हवालदार मिर्झा, संजय भोई यांनी ही कारवाई केली.

रुग्णवाहिका तपासण्याची गरज

महामार्गावरून दिवसाकाठी परप्रांतामधील अनेक रुग्णवाहिकासदृश वाहने सायरन वाजवत वाहतूक करतात. त्यांची दारे, खिडक्या कापड किंवा डार्क फिल्म लावून बंदिस्त केलेली असतात.

त्यामुळे आत काय आहे, याचा अंदाज येत नाही. त्याचा गैरफायदा घेऊन अपकृत्यांसाठीही त्यांचा वापर होत असल्याची शक्यता नाकारता येत नाही. टोलमधून सूट मिळविणे, सायरन वाजवून गर्दीतून जागा मिळविणे अशा उद्देशानेही काही जण रुग्णवाहिकांचा दुरुपयोग करीत आहेत.

कोरोना संक्रमण कालावधीत अनेक रुग्णवाहिका अवैधरीत्या प्रवासी वाहतूक करण्याच्या उद्योगात सहभागी असल्याचे निष्पन्न झाले होते. या पार्श्वभूमीवर महामार्गावर मिळणाऱ्या विशेष सवलतींचा गैरफायदा घेऊन फसवणूक करणाऱ्या, अवैध व्यवसायात सहभागी रुग्णवाहिका हुडकण्याची मोहीम पोलिसांनी हाती घ्यावी, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lok Sabha election 2024 Results : भारतातल्या लोकसभा निकालावर चीनची प्रतिक्रिया; ''जर मोदी पुन्हा पंतप्रधान झाले तर...''

Bollywood Actor: माधुरीचा ड्रायव्हर म्हणून केलं काम, पहिल्याच चित्रपटात रेखासोबत इंटिमेट सीन, पण फ्लॉप अभिनेत्याचा लागला टॅग, पण आता...

Lucknow Robbery : चोरी करायला गेला अन्..एसीत झोपला ; लखनऊच्या चोराचा पराक्रम पाहिलात काय?

Crime News: मुंबईच्या IAS आधिकाऱ्याच्या मुलीने उचललं टोकाचं पाऊल; कारण अस्पष्ट

Iran: इराणमध्ये अध्यक्षपदासाठी महिला उमेदवार रिंगणात, पण निवडणुकीआधीच होणार पराभव? कारण काय?

SCROLL FOR NEXT