water supply scheme
water supply scheme esakal
उत्तर महाराष्ट्र

Dhule News : वलवाडी डब्ल्यूटीपी- तुळशीरामनगर पाइपलाइन मंजूर; पाणी योजनेला बळकटी

सकाळ वृत्तसेवा

Dhule News : केंद्र शासनाच्या अमृत अभियानांतर्गत धुळे शहरासाठी महत्वाकांक्षी अक्कलपाडा पाणीपुरवठा मंजूर असून या योजनेचे काम सध्या अंतिम टप्प्यात आहे. दरम्यान, या मुख्य योजनेबरोबरच इतर संलग्न पाणीपुरवठा योजनांचा प्रस्तावही शासनाकडे पाठविण्यात आला आहे.

दरम्यान, यातील वलवाडी जलशुद्धीकरण केंद्र ते धुळे शहरातील तुळशीराम नगरदरम्यान पाइपलाइन व रॉ वॉटर पंपहाऊससाठी ३३ केव्ही लाईनला राज्य शासनाने मंजुरी दिली आहे. एकूण ८.४७ कोटी रुपये खर्चास शासनाने प्रशासकीय मंजुरी दिली आहे.

तसा शासन निर्णय ६ एप्रिल २०२३ ला निर्गमित झाला आहे. महापालिका यंत्रणेला मात्र याबाबत अद्यापही खबरबात नसल्याचे दिसते. (Valwadi WTP Tulshiramnagar pipeline approved Strengthening of water scheme Dhule News)

केंद्र शासन पुरस्कृत अमृत अभियानाची राज्यात २०१५-१६ वर्षापासून अंमलबजावणी करण्यात येत आहे. या अभियानांतर्गत पाणीपुरवठा, मलनि:स्साण, पर्जन्य जलवाहिनी, नागरी परिवहन व हरित क्षेत्र विकास आदी पायाभूत सुविधांची निर्मिती करण्यात येत आहे.

यात धुळे शहरासाठीही ९ ऑगस्ट २०१९ मध्ये महत्वाकांक्षी अक्कलपाडा पाणीपुरवठा योजनेला सुधारित प्रशासकीय मंजुरी मिळाली. एकूण १६९ कोटी रुपये खर्चाची ही योजना असून यात तापी पाणीपुरवठा योजना व डेडरगाव पाणीपुरवठा योजनेच्या दुरुस्ती, नूतनीकरणाचाही समावेश आहे.

दरम्यान, अक्कलपाडा पाणीपुरवठा योजना धुळेकरांसाठी अत्यंत महत्त्वपूर्ण असल्याने या योजनेच्या पूर्णत्वाकडे सध्या लक्ष लागून आहे. योजनेचे ९५ टक्के काम झाल्याचा दावाही यंत्रणेकडून करण्यात येत आहे.

दरम्यान, अक्कलपाडा योजनेबरोबरच हद्दवाढ क्षेत्रातही विविध संलग्न पाणी योजना मंजूर होणे आवश्‍यक आहे. त्यातूनच मुख्य धुळे शहराबरोबरच हद्दवाढ क्षेत्राची पाण्याची गरज पूर्ण होऊ शकणार आहे. याअनुषंगाने या क्षेत्रातील पाणी योजनांचा प्रस्ताव शासनाकडे पाठविण्यात आला आहे.

हेही वाचा : संतुलित आहारातून रोखा फॅटी लिव्हरचा आजार

वलवाडीची योजना मंजूर

दरम्यान, अमृत अभियानांतर्गत धुळे शहराच्या पाणीपुरवठा प्रकल्पाचे काम पूर्ण करण्यासाठी तांत्रिकदृष्ट्या आवश्‍यक उपांगास प्रशासकीय मान्यता देण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती.

यात वलवाडी जलशुद्धीकरण केंद्र ते तुळशीरामनगरदरम्यान ३०० एमएम डीआय पाइपलाइनच्या कामास तसेच रॉ वॉटर पंपहाऊससाठी ३३ केव्ही लाईनच्या कामास शासनाने प्रशासकीय मान्यता दिली आहे.

सदर प्रकल्पाच्या अनुषंगाने सर्व तांत्रिक बाबींची पूर्तता करण्याची व वस्तू व सेवा कराच्या बाबींची परिगणना प्रमाणित करूनच देयक अदा करण्याची संपूर्ण जबाबदारी तसेच अमृत अभियान व या प्रकल्पाच्या अनुषंगाने वेळोवेळी निर्गमित अटी व शर्तीची पूर्तता करण्याची संपूर्ण जबाबदारी महापालिका आयुक्तांची राहील असे शासन निर्णयात नमुद केले आहे.

एकूण ८.४७ कोटीच्या या प्रकल्पात केंद्र शासनाचा हिस्सा ४.२३५ कोटी तर राज्य शासन व धुळे महापालिकेचा प्रत्येकी २.११७ कोटी रुपये हिस्सा आहे.

-३०० एमएम डीआय पाइपलाइन............५.३० कोटी

-रॉ वॉटर पंप हाऊससाठी ३३ केव्ही लाइन...३.१७ कोटी

-एकूण....................................८.४७ कोटी रुपये

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jalgaon Major Accident: भरधाव कारच्या धडकेत मजुरी करण्याऱ्या आईसह दोन चिमुकले ठार!

IPL 2024 DC vs RR : दिल्लीचा राजस्थानला दणका, घरच्या मैदानात मिळवला दणदणीत विजय; संजू सॅमसनचे अर्धशतक व्यर्थ

Virtual Touch: बालकांना 'व्हर्च्युअल स्पर्शा'च्या धोक्याची जाणीवही करुन देणं गरजेच - हायकोर्ट

Navneet Rana: "काँग्रेसला मत देणं म्हणजे थेट पाकिस्तानला मत देणं"; नवनीत राणांचं वादग्रस्त विधान

यवतमाळ जिल्हा कारागृहातील धक्कादायक घटना; कारागृहातील अधिकारी, कर्मचाऱ्यावर कैद्यांच्या टोळीचा हल्ला

SCROLL FOR NEXT