Nandurbar News  esakal
उत्तर महाराष्ट्र

Nandurbar News : तळोद्यात वाहनांच्या गर्दीला नियोजनाची गरज

सकाळ वृत्तसेवा

तळोदा (जि. नंदुरबार) : वाढलेल्या वाहनांच्या (Vehicles) संख्येमुळे शहरात वाहतुकीला शिस्त लावण्यासाठी नियोजनाची गरज आहे.

त्यासाठी पोलिस विभाग, पालिका व शहरातील नागरिकांनी पुढाकार घेऊन वाहतुकीला शिस्त लागण्यासाठी पुढाकार घ्यावा, अशी अपेक्षा सर्वसामान्य तळोदेकर व्यक्त करीत आहेत. (Vehicular congestion requires planning in taloda nandurbar news)

एकट्या बसस्थानक परिसरात अस्ताव्यस्त वाहनांच्या गर्दीने वाहनधारक जीव मुठीत धरून वाहने हाकत असतात. त्यामुळे नियोजन करणे आवश्यक झाले असल्याचे बोलले जात आहे.

प्रत्येक शहरात दिवसेंदिवस वाहनांची संख्या वाढत आहे. तळोदा शहरदेखील त्यास अपवाद नाही. मात्र वाहन कुठेही पार्क करणे, चुकीच्या बाजूने वाहन पुढे घेऊन जाणे, दुचाकीवर तीन ते चार सीट बसवून दुचाकी हाकणे,

चौक असेल तेथे आपल्याच बाजूने चौकाला वळसा घालून पुढे न जाणे अशा प्रकारे वाहने चालविण्याकडे वाहनधारकांचा कल दिसून येत आहे. त्यामुळे शहरातील प्रत्येक रस्त्यावर अनियंत्रित वाहतूक व वाहनांची गर्दी, पादचाऱ्यांना धडक देणे अशा घटनांमध्ये वाढ होताना दिसत आहे.

हेही वाचा : ..ही काळजी घ्या नाहीतर खिसा होईल साफ!

बसस्थानक परिसरासारख्या महत्त्वाच्या ठिकाणी वीर बिरसा मुंडा चौक आहे. या चौकात वाहने कुठेही लावलेली दिसतात. अनेकदा बसचालकांना बस काढणे जिकिरीचे जाते. त्यात वीर बिरसा मुंडा चौकात चारही दिशांनी वाहने येतात.

मात्र कोणतेही वाहन आपल्या बाजूनेच चौकाला वळसा घालून जात नाही. त्यामुळे शहरातून चिनोदा रस्त्यावरून व शहादा रस्त्याकडून वाहने अचानक वळण घेऊन येत असतात. चिनोदा मार्गावर नेहमी अपघात होतात. त्यामुळे वीर बिरसा मुंडा चौकात वाहने पुढे नेण्यासाठी वाहतूक विभागाने लक्ष देण्याची अपेक्षा आहे.

दुसरीकडे सध्या मेन रोडचे बांधकाम सुरू असल्याने स्मारक चौकात वाहनांची वर्दळ नाही. मात्र तेथेदेखील वाहनधारकांसाठी उपाययोजना कराव्यात, अशी अपेक्षा शहरवासीय व्यक्त करीत आहेत.

स्मारक चौकात काही वर्षांपूर्वी तत्कालीन पोलिस उपनिरीक्षक राजपूत यांच्या कल्पनेतून बॅरिकेड्स लावण्यात आली होती. मात्र त्यानंतर वाहतुकीला शिस्त लागावी म्हणून कोणत्याही उपाययोजना केल्या गेल्या नाहीत. त्यामुळे पालिका, पोलिस विभाग व नागरिकांनी पुढाकार घेण्याची गरज आहे.

वाहनांच्या गर्दीवर नियंत्रण हवे

शहरात पार्किंगची सोय नाही. त्यामुळे वाहने लावणार कुठे, असा प्रश्न निर्माण होतो. जेथे काम आहे तेथेच वाहन लावण्याची पद्धत तयार झाली आहे. त्यात शहरातील रस्ते मर्यादित आहेत. बायपास रस्त्यांचे जाळे तयार झालेले नाही. त्यामुळे सर्व प्रकारची वाहतूक शहरातूनच होते. त्यामुळे वाहनांच्या गर्दीवर नियंत्रण आणण्यासाठी उपाययोजना कराव्यात, अशी मागणी जोर धरू लागली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs SL, 2nd Test, 4th Day: श्रीलंकेला आघाडी घेण्यात यश, पण भारताची सामन्यावर मजबूत पकड; सूरियाबंदाराचं शतक हुकलं

Narali Purnima 2026: नारळी पौर्णिमेच्या दिवशी श्रीफळाचा 'हा' उपाय करा; मनातील २ महत्त्वाच्या इच्छा होतील पूर्ण!

B.Arch Admission Round 3 : बी. आर्किटेक्चर प्रवेश प्रक्रियेची तिसरी यादी जाहीर; ७५८ विद्यार्थ्यांना नवी संधी, ५३६ जणांचे ऑटो फ्रिज प्रवेश निश्चित

विदर्भासह मध्य भारतात पावसाचा अलर्ट; अतिमुसळधार पावसाचा इशारा

Sakal Impact | MPSC Drug Inspector Exam Scam: एमपीएससी औषध निरीक्षक भरतीत पेपरफुटीला दुजोरा; संपूर्ण प्रक्रिया रद्द, शुल्काविना फेरपरीक्षा जाहीर

SCROLL FOR NEXT