Vijay Saner esakal
उत्तर महाराष्ट्र

Dhule Municipal Corporation : विजय सनेर यांच्याकडे महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्तपदाची जबाबदारी

सकाळ वृत्तसेवा

Dhule News : महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्तपदाची जबाबदारी तात्पुरत्या स्वरूपात उपायुक्त विजय सनेर यांच्याकडे सोपविण्यात आली आहे. अत्यंत वेगवान पद्धतीने ही कार्यवाही झाल्याचे पाहायला मिळाले.

महापालिकेतील अतिरिक्त आयुक्त नितीन कापडणीस यांची नंदूरबार येथे बदली झाल्यानंतर महापालिकेतील अतिरिक्त आयुक्तपद रिक्त झाले.

प्रशासकीय कामकाजात गतिमानता येण्यासाठी उपायुक्त (आरोग्य) श्री. सनेर यांच्याकडे अतिरिक्त आयुक्तपदाचा पदभार पुढील आदेश होईपर्यंत तात्पुरत्या स्वरूपात सोपविण्यात येत आहे. (Vijay Saner was entrusted with the post of Additional Commissioner Dhule News)

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

आपल्या मूळ पदाचा पदभार सांभाळून अतिरिक्त आयुक्तपदाचा पदभार व जबाबदाऱ्या पार पाडाव्यात असे आयुक्त देविदास टेकाळे यांनी याबाबत काढलेल्या आदेशात नमूद केले आहे.

अतिरिक्त आयुक्तपद रिक्त झाल्याच्या दुसऱ्याच दिवशी (ता.१) झालेल्या स्थायी समिती सभेत सत्ताधारी भाजपचे सदस्य हर्षकुमार रेलन यांनी श्री. सनेर यांच्याकडे अतिरिक्त आयुक्तपदाची जबाबदारी सोपवावी अशी मागणी केली होती.

सभापती किरण कुलेवार यांनीही आजच त्यांची नियुक्ती करण्याची सूचना आयुक्तांना केली होती. त्यानुसार आयुक्त टेकाळे यांनी त्याच दिवशी अर्थात १ जूनला श्री. सनेर यांच्याकडे जबाबदारी सोपविण्याचा आदेश काढला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MPSC विद्यार्थ्यांचं आंदोलन मागे, चौकशी पूर्ण होईपर्यंत अध्यक्ष सक्तीच्या रजेवर; मध्यरात्री घडामोडी, पुण्यात आंदोलकांचा जल्लोष

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढे होणार MPSCच्या चौकशी आयोगाचे नवे सचिव, शिवेंद्र राजेंची मोठी घोषणा

IND vs WI, 3rd T20I: अभिषेकच्या वादळानंतर अर्शदीपचा अचूक मारा अन् भारताचा वेस्ट इंडिजवर थरारक विजय; मालिकेतही आघाडी

सूर्यदेव तूळ राशीत प्रवेश करताच १२ राशींचं नशिब बदलणार? करिअर, पैसा अन् नात्यांवर कसा होणार परिणाम?

Ranji Trophy: ८ चौकार अन् ३ षटकार... रिंकू सिंगचं खणखणीत नाबाद शतक; टीम इंडियात पुनरागमनासाठी ठोकली दावेदारी

SCROLL FOR NEXT