Taloda: Damage to the nursery in the taluka due to storms. esakal
उत्तर महाराष्ट्र

Nandurbar News : सातपुडा पायथा परिसरात बत्तीगुल; ग्रामस्थांची पाण्यासाठी शोधाशोध

सकाळ वृत्तसेवा

Nandurbar News : तळोदा तालुक्यातील सातपुड्याच्या पायथ्याशी असलेल्या अनेक गाव-पाड्यांमध्ये रविवारी (ता. ४) आलेल्या वादळी वाऱ्यांमुळे असंख्य नागरिकांची घरे, शेतीशिवारात मोठे नुकसान झाले.

तसेच वीजपुरवठादेखील खंडित झाला असून, वीजपुरवठा सुरळीत होण्यासाठी काही दिवस लागू शकतात.

मात्र विजेअभावी ग्रामस्थांची पाण्यासाठी शोधाशोध होत आहे, तर शेतकऱ्यांचीदेखील पीक वाचविण्यासाठी धडपड सुरू आहे. एकंदरीत वादळी वाऱ्यांमुळे सर्वांनाच मोठा फटका बसला आहे. (Villagers search for water Farmers struggle to save crops electricity cut in Satpura Paytha area Nandurbar News)

रविवारी तळोदा शहरासह तालुक्यातील रांझणी, प्रतापपूर, चिनोदा, रोझवा पुनर्वसन, गढीकोठडा, लक्कडकोट, आंबागव्हाण, केलवापानी, राणीपूर, ढेकाठी, धनपूर, सावरपाडा आदी परिसरात आलेल्या वादळी वाऱ्यांमुळे खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

यात असंख्य नागरिकांची घरे, शेतीशिवारात मोठे नुकसान झाले आहे. त्याचबरोबर वाऱ्यांमुळे वीजखांबही मोठ्या प्रमाणावर उन्मळून पडल्याने वीजपुरवठा खंडित झाला आहे.

वीजपुरवठा सुरळीत होण्यासाठी अजून काही दिवस लागण्याचा अंदाज व्यक्त होत आहे. मात्र त्यामुळे परिसरातील ग्रामस्थांना मोठ्या प्रमाणावर पाण्यासाठी शोधाशोध करावी लागत आहे. नागरिक स्थानिक परिसरातील हातपंप, विहिरी येथून पाणी आणत असून, पाणीसाठा करून ठेवण्यात येत आहे.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

काही शेतकऱ्यांकडून आपली पिके वाचविण्यासाठी तळोदा येथून टँकर भरून आणून पिकांना पाणी देऊन पिके वाचविण्याची धडपड करीत आहेत.

दरम्यान, परिसरात काही शेतकऱ्यांनी गेल्या आठवड्यातच बागायती कापसाची लागवड केली होती, त्यामुळे ते कोवळे पीक वाचविण्यासाठी त्यांच्याकडून विशेष प्रयत्न करण्यात येत असून, कापूस पिकाला चुहा देण्यात येत आहे. परिसरातील रोपवाटिकांमध्येहीही मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून, वारावादळामुळे शेडनेट अस्ताव्यस्त झाले आहे.

त्यातील रोपही सैरभर झाल्याचे चित्र आहे. त्या रोपांना वाचविण्यासाठीही रोपवाटिकाधारकांकडून टँकर मागवून रोपांना पाणी मारण्यावर भर दिला जात आहे. परिसरात केळी पिकाचीही अवस्था बिकट असून, वारा, वादळामुळे केळी पीक आडवे पडले असून, त्याचा तत्काळ पंचनामा होऊन नुकसानभरपाई मिळावी, अशी अपेक्षा केळी उत्पादक शेतकऱ्यांकडून व्यक्त होत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

TMC Symbol Row : निवडणूक आयोगाने 'तृणमूल'चे चिन्ह गोठवले ! ममता आणि रितब्रता गटांकडून मागवले नवे चिन्ह अन् नाव

Team India Schedule : अफगाणिस्तानला लोळवलं, आता भारत पुढे कोणाकोणाचा कार्यक्रम करणार? Asian Games ते ऑस्ट्रेलियाचा भारत दौरा, जाणून घ्या संपूर्ण वेळापत्रक

Maharashtra eco-friendly Ganesh idols: राजभवन ते वर्षा निवासापर्यंत उरुळी कांचनच्या पर्यावरणपूरक ‘वृक्ष गजानना’चा डंका; मंदार आर्टसच्या गणेशमूर्तींना राज्यभर मानाचे स्थान

Junnar water dispute case: सामाईक विहिरीच्या पाण्याच्या वादातून मारहाण; जुन्नर न्यायालयाकडून दोघांना एक वर्षांची शिक्षा व दंड

Ranjangaon Ganpati Tradition: रांजणगाव परिसरात शेकडो वर्षांची ‘एक गाव, एक गणपती’ परंपरा कायम; महागणपतीच सर्वांची आराध्य देवता

SCROLL FOR NEXT