Water was released from the Prakash Barrage medium project.  esakal
उत्तर महाराष्ट्र

Nandurbar News : तापी नदीकाठावरील गावांना सतर्कतेचा इशारा; बॅरेजेसचे प्रत्येकी 2 गेट अर्धा मीटरने उघडले

सकाळ वृत्तसेवा

Nandurbar News : हतनूर धरणातून दोन हजार ३३० क्यूसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे. त्यानुसार सुलवाडे, सारंगखेडा, प्रकाशा बॅरेजेसचे सकाळी नऊला प्रत्येकी दोन गेट अर्धा मीटरने उघडण्यात आले आहेत. (Villages on banks of Tapi river alert nandurbar news)

त्यातून सुलवाडे (३,७७६ क्यूसेक), सारंगखेडा (३,५९२ क्यूसेक्स), प्रकाशा (३,७०४ क्यूसेक) विसर्ग तापी नदीपात्रात सोडण्यात आला. काठावरील गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

यंदाच्या हंगामात तब्बल दोन आठवडे उशिराने पहिल्यांदा पाणीपातळीत वाढ झाल्याने हतनूर (जि. जळगाव) धरणाचे दोन दरवाजे अर्धा मीटरने उघडून दोन हजार ३३० क्यूसेक पाण्याचा विसर्ग तापी नदीपात्रात सुरू आहे. त्यामुळे खानदेशातील तापी नदीवरील तिन्हीही बॅरेजेसचे द्वार परिचालन करणे प्रक्रियेला सोमवारी (ता. १०) सकाळी नऊला सुरवात करण्यात आली.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

त्यात सुलवाडे बॅरेजमधून ३,७७६ क्यूसेक, सारंगखेडा ३,५९२ क्यूसेक, तर प्रकाशा बॅरेज मध्यम प्रकल्पातून ३,७०४ क्यूसेक पाण्याचा विसर्ग तापी नदीत करण्यात आला. प्रकाशा बॅरेज मध्यम प्रकल्पाचे गेल्या वर्षी २८ जूनला द्वार परिचालन प्रक्रियेला सुरवात झाली होती, तर १५ ऑक्टोबरला शंभर टक्के पाणीसाठा प्रकाशा बॅरेज मध्यम प्रकल्पात करण्यात आला होता.

सोमवारी द्वार परिचालनापूर्वी येथील प्रकल्पाची पाणीपातळी १०९.२० मीटर होती. दोन दरवाजे उघडले असून, पाण्याचा येवा लक्षात घेता विसर्ग वाढविण्यात येऊ शकतो. तापी नदीकाठावरील गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आल्याची माहिती प्रकाशा पाटबंधारे विभागाचे शाखा अभियंता मयूर परदेशी यांनी दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Solapur Crime:'पैशांवरून पत्नीचा खून; पतीस जन्मठेप'; गॅस टाकीसाठी ठेवलेले पैसे पतीने दारुत उडवले, नेमकं काय घडलं?

Latest Marathi News Live Update: डिश बसवताना डोक्यावर पडली वीट

आम्ही सगळे थोडे घाबरलोय कारण... वहिनी कतरिना कैफच्या प्रेग्नन्सीबद्दल काय म्हणाला विकी कौशलचा भाऊ सानी कौशल?

OBC Reservation : धनगर समाजाने सत्ता काबीज करुन ओबीसींचं आरक्षण वाढवावं; प्रकाश आंबेडकरांनी सांगितला नवा फॉर्म्युला

Solapur News: सोलापुरात पूर ओसरल्यानंतरही डेंगी-टायफॉईडचा प्रादुर्भाव; मनपाकडून घरोघरी तपासणी सुरू

SCROLL FOR NEXT