residentional photo
residentional photo 
उत्तर महाराष्ट्र

राष्ट्रीय व्हॉलीबॉल स्पर्धेत महाराष्ट्राचे आव्हान संपुष्टात

सकाळ वृत्तसेवा

नाशिक- नेवासा येथे क्रीडा व युवक सेवा संचालनालय, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयातर्फे व महाराष्ट्र व्हॉलीबॉल असोसिएशंन,त्रिमूर्ती स्पपोर्टस क्लब यांच्या सहकार्याने सुरू असूलेल्या ६५ व्या शालेय राष्ट्रीय व्हॉलीबॉल स्पर्धेत साखळी सामन्यात महाराष्ट्राच्या संघाला हरियाणा संघाने पराभूत केले. या पराभवामुळे महाराष्ट्राचे आव्हान संपुष्टात आले आहे.

केरळ,पश्चिम बंगाल,राजस्थानची आघाडी

 उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात अनुक्रमे केरळ, पश्चिम बंगाल, राजस्थान, तेलंगणा, गुजराथ, तामिळनाडू, हरयाणा, सी. बी. एस. सी., या संघानी आपल्या बाद फेरीच्या सामन्यात विजय मिळवून उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला.

हरियाणाचा सुरेख खेळ

" ड " गटात समावेश असलेल्या महाराष्ट्राच्या खेळाडूंनी साखळी सामन्यात  सुंदर खेळाचे प्रदर्शन करून प्रथम बिहार संघाचा ३-० असा तरं दुसऱ्या सामन्यात जम्मू --काशमीर संघवरही सरळ ३-० अशी सहज मात करून आपल्या खात्यात सलग दोन विजयाची नोंद केली होती.  मात्र आपल्या "ड" गटातील अखेरच्या साखळी सामन्यात महाराष्ट्राच्या संघाला हरीयाणाकडून हार पत्करावी  लागल्यामुळे  महाराष्टाच्या संघाला " फ " गटात प्रथम क्रमांक मिळविलेल्या  सी. बी. एस. सी., संघाविरुद्ध सामना करावा लागला. या सामन्यातही महाराष्ट्राच्या संजरी भोईटे, सिद्धी जानकर, श्रावनी कोलते, वेदिका शिंदे, यांनी  संजना जागतापच्या पासेसवर चांगले  स्माशेश,आणि सुंदर ड्रॉप्स टाकून गुण मिळविण्याचे  निकराचे  प्रयत्न केले.

पंजाब,दिल्ली,तामीळनाडू सामन्यात चुरस

      या आठ  उपउपांत्यपुर्व फेरीतील पंजाब विरुद्ध तामिळनाडू या दोन बलाढ्य संघातील सामना चांगलाच रंगला. यामध्ये तामिळनाडूच्या जोमाने खेळ करून हा सामना ३-० असा जिंकून उपांत्यपूर्व फेरीत  प्रवेश केला. या मधील  तेलंगणा विरुद्ध दिल्ली हा सामना फारच रंगतदार झाला   यामध्ये तेलंगणाने  पहिला सेट २५- १७ असा जिंकून आघाडी घेतली तर दिल्लीने दुसरा सेट २५-२३ असा जिंकून बरोबरी साधली तर तिसरा सेट पुन्हा तेलंगणाने जिंकून २-१ अशी आघाडी घेतली तर दिल्ली संघाने पुन्हा मुसंडी मारून चवथा सेट  २५- २५-२१ असा जिंकून २-२ अशी बरोबरी साधली. मात्र निर्णायक पाचव्या सेटमध्ये तेलंगणाच्या स्मेशर्सनी कधी जोरदार फटके तर कधी सुंदर हलके ड्रॉप्स टाकून  सामन्यामध्ये सांघिक खेळाचे प्रदर्शन करून उपस्थित क्रीडा प्रेमींची मने जिंकली.

उपउपांत्यपूर्व फेरीचे  निकाल- 
-)पश्चिम बंगाल विजयी विरुद्ध पॉण्डेचारी   (३-०)
- केरळ  विजयी विरुद्ध उत्तर प्रदेश   (३-०) 
- तामिळनाडू  विजयी विरुद्ध पंजाब  (३-०) 
- हरयाणा विजयी विरुद्ध हिमाचल प्रदेश ( ३-०) 
 -राजस्थान विजयी विरुद्ध कर्नाटक  (३-०)   
-सी.बी.एस.सी विजयी विरुद्ध महाराष्ट्र  (३-०)
-तेलंगणा  विजयी विरुद्ध दिल्ली  ( ३-२)
-गुजराथ विजयी विरुद्ध छत्तीसगड  (३-०)

यानंतर होणारे उपांत्य सामने 
-पश्चिम बंगाल  विरुद्ध केरळ 
-तामिळनाडू विरुद्ध हरयाणा 
-राजस्थान विरुद्ध  सी.बी.एस.सी
-तेलंगणा विरुद्ध गुजराथ 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Hemant Savara: पालघरचा तिढा अखेर सुटला! हेमंत सावरांना महायुतीकडून उमेदवारी जाहीर

Udayanraje Bhosale : साताऱ्यातून उमेदवारी जाहीर करायला भाजपला इतका वेळ का लागला? उदयनराजे भोसलेंनी स्पष्टच सांगितलं; पाहा Exclusive Interview

Rohit Sharma Rinku Singh : पत्रकार परिषदेनंतर रोहित रिंकूला भेटला; केकेआरनं केलं ट्विट

SRH vs RR Live IPL 2024 : दोन धक्क्यानंतर यशस्वी, रियाननं डाव सावरला; राजस्थान 10 षटकात शतक पार

Akola News : अनुपजी..भाजपचे पैसे पोहचले नाही; व्हीडिओ व्हायरल, बार्शिटाकळीत गुन्हा दाखल

SCROLL FOR NEXT