guj.jpg
guj.jpg 
उत्तर महाराष्ट्र

वघईचा गिरा धबधबा ठरलाय महाराष्ट्र-गुजरातच्या पर्यटकांचे आकर्षण

रोशन खैरनार

सटाणा : महाराष्ट्र आणि गुजरात राज्यांच्या सीमावर्ती भागातील वघई (जि. डांग, दक्षिण गुजरात) येथील गिरा धबधबा सध्या निसर्ग सौंदर्याने फुलला आहे. महाराष्ट्रातील पावसाने सध्या दडी मारली असताना गुजरातमध्ये पाऊस धो-धो कोसळतोय. त्यामुळे सध्या महाराष्ट्रातील हौशी पर्यटकांसाठी वघईचा गिरा धबधबा (वॉटरफॉल) ‘फेव्हरीट वन डे डेस्टीनेशन’ म्हणून खास आकर्षण ठरले आहे.

गुजरातची चेरापुंजी म्हणून वघई परिसराची ओळख आहे. या भागात बांबूच्या झाडांचे घनदाट जंगल असून पावसाचे प्रमाण खूप आहे. बागलाण तालुक्याच्या आदिवासी पश्चिम पट्ट्यातील साल्हेर किल्ल्याच्या पर्वतरांगांलगत दोन्ही राज्यांच्या सीमेवर असलेल्या प्रसिद्ध चिंचली घाटापासून ते थेट वघईपर्यंत दरवर्षी मोठ्या प्रमाणात पाऊस पडतो. पावसाळ्यात चिंचली घाट परिसरात जणूकाही काश्मीरमध्ये आल्याचा भास होतो. सध्या चिंचली घाट ते वघईपर्यंतच्या परिसरात हिरवाईची झालर पसरली असून निसर्ग खुलून गेला आहे. वघई गावापासुन अवघ्या तीन किलोमीटर अंतरावर ‘कापरी’ नदीवर महाकाय गिरा धबधबा आहे.

गुजरातचा नाईझिरा वॉटरफॉल म्हणून या धबधब्याची ओळख आहे. पावसाळी पर्यटनाचा आनंद घेण्यासाठी सज्ज असलेल्या पर्यटकांना गिरा धबधबा जणू काही खुणावत असतो. मान्सूननंतर धबधबा पहाण्यासाठी हजारो पर्यटक येथे हजेरी लावतात. प्रशासनातर्फे या परिसरात वाहन पार्किंगची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. 

येथील हिरव्यागार वनराईने व धबधब्याने पर्यटकांना भुरळ घातली आहे. ७५ फुट उंच असलेल्या गिरा धबधब्यातून कोसळणारे पांढरे शुभ्र पाणी व त्या पाण्यातून उडणारे तुषार हा अद्भुत नजारा प्रत्येकाच्या डोळ्याचे पारणे फेडतो. खाली कोसळणाऱ्या धबधब्याचे पाणी एका डोहात जमा होऊन अंबिका नदीत वाहत जाते.

दरम्यान, अंबिका नदी एका धबधब्यासारखी कोसळून पुढे अलमोराजवळ अरबी समुद्रात जाऊन मिळते. डोहाच्या बाजूला भलेमोठे खडक असून पर्यटक या खडकांवर उभे राहून छायाचित्रणाचा आनंद घेतात. या धबधब्याचा आनंद घेऊन परतीच्या वाटेवर लागताना नजर पुन्हा मागे फिरते. या अद्भुत आणि निसर्गसौंदर्याचा अनोखा नजराणा असलेल्या गिरा धबधब्याकडे पाहण्याचा मोह काही आवरता येत नाही.

कसे जावे : 
सटाणा येथून ११४ किलोमीटर अंतर असून ताहाराबाद, मुल्हेर पासून पुढे सरळ चिंचली घाटामार्गे अहवा आणि अहवापासून पुढे ३२ किलोमीटर अंतरावर वघई गाव आहे. गावाजवळ अवघ्या तीन किलोमीटर अंतरावर सापुतारा – सूरत महामार्गावर गिरा धबधबा आहे. मुंबईपासून २५० किलोमीटर, नाशिकपासून १२५ किलोमीटर, सापुतारापासून ५० किलोमीटर अंतर असून महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळाच्या बसने अहवा पर्यंत किंवा खासगी वाहनाने थेट जाता येते. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sucharita Mohanti: काँग्रेसची दुर्दशा सुरूच! आणखी एका उमेदवारानं परत केलं लोकसभेचं तिकीट; कारण ऐकून म्हणाल...

Hardik Pandya MI vs KKR : पांड्यानं केली मोठी चूक; त्याच्यामुळेच मुंबईची ही अवस्था... इरफाननं कॅप्टन हार्दिकवर साधला निशाणा

RBI: मोदी सरकार बायबॅक करणार 40 हजार कोटींचे सोवेरियन बाँड, आरबीआयची माहिती; गुंतवणूकदारांचे काय होणार?

"माझी लाडकी जिवंत आहे", आई 3 दिवस मुलीच्या मृतदेहासोबत झोपली! पोलीस आले अन्...

Latest Marathi News Live Update : उद्योग मंत्री उदय सामंत यांच्या सुरक्षेत वाढ

SCROLL FOR NEXT