Planting of horticultural rabi gram in progress by tractor, the water level of the well has gone deep.  esakaL
उत्तर महाराष्ट्र

Dhule News : यंदा बागायती रब्बीनी आवरती बागायत..! विहिरी कूपनलिकांची पातळी खालावतेय

सकाळ वृत्तसेवा

Dhule News : या वर्षी भीषण दुष्काळी स्थिती आहे. खरीप हंगाम पुरेशा पावसाअभावी केवळ २०-३० टक्केच आला. परतीच्या पावसानेही पाठ दाखविली. कोरडवाहू जमिनीच्या रब्बी हंगामाच्या आशाही संपल्या.

आता बागायतदार शेतकऱ्यांच्या विहिरी व कूपनलिकांची पाणी पातळी खालवत चालली आहे. पाण्याचा अंदाज घेत, रब्बीची पेरणी करीत आहेत. (water level of wells and borewells of horticultural farmers is decreasing dhule news)

गव्हापेक्षा हरभऱ्याचा पेरा वाढला आहे. ‘यंदा बागायती रब्बीनी आवरतीच बागायत’ असल्याचे बागायतदार शेतकऱ्यांनी सांगितले. धुळे तालुक्यात १९७२ च्या रब्बी हंगामाची आठवण व्हावी, अशा भीषण दुष्काळाची स्थिती निर्माण झाली आहे. बहुतेक गावांमध्ये आतापासूनच पाणीटंचाई निर्माण झाली आहे.

तालुक्यातील देवभाने, सातपायरी, निमडाळे, गोंदूर, बोरीवरील पुरमेपाडा धरण आदी धरणांमध्ये मृत जलसाठा शेष आहे. या धरणांमधून सलग तीन वर्षांपासून रब्बीचा शंभर टक्के हंगाम फुलत होता. आता ही धरणे गावांना पाणीपुरवठाही करू शकत नाहीत एवढा अल्प साठा शिल्लक आहे.

तालुक्यातील बारमाही चालणाऱ्या विहिरी आणि कूपनलिकांची पातळी खोलवर झाली आहे. या पातळीत दररोजच फरक आढळून येत आहे. गव्हासाठी अधिक पाण्याची गरज असते. त्या तुलनेत हरभऱ्यासाठी अधिकच्या पाण्याची आवश्यकता नसते. हरभरा पेरण्यावर अधिक भर दिला जात आहे. इतर बागायती पिके कमी झाली आहेत. आतापासूनच ६० टक्के बागायत कमी झाली आहे.

''भीषण दुष्काळी स्थिती आहे. शासनाने अद्यापही दुष्काळग्रस्तांसाठी भरीव मदत घोषित केलेली नाही. लोकप्रतिनिधीही शेतकऱ्यांसाठी पाहिजे तेवढा पाठपुरावा करीत नाहीत, ही शोकांतिका आहे.''-आत्माराम पाटील, माजी जिल्हाध्यक्ष, शेतकरी संघटना, धुळे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nagpur News : कविकुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठाच्या कुलगुरूंचं अपघाती निधन, पत्नीचाही मृत्यू; मूळ गावी जाताना घडली घटना

Latest Marathi News Updates : कोल्हापुरात रात्री झालेल्या दंगलीच्या पार्श्वभूमीवर कोल्हापूर पोलिसांची दोन्ही समाजांसोबत बैठक

Chhagan Bhujbal : लिंगायत समाजातील पोटजातींचा लवकरच ओबीसींमध्ये समावेश; मंत्री छगन भुजबळ यांचे प्रतिपादन!

"म्हणून मी वडिलांचं टॅक्सी चालवणं बंद केलं.." ती आठवण सांगताना ढसाढसा रडले भरत जाधव; जुना VIDEO चर्चेत

Rohit Sharma नवी लँबॉर्गिनी घेऊन निघाला, मुंबईच्या ट्रॅफिकमध्ये अडकला; फॅनने पाहताच पाहा कशी दिली रिअ‍ॅक्शन

SCROLL FOR NEXT