Ekvira devi
Ekvira devi esakal
उत्तर महाराष्ट्र

Dhule News : एकवीरादेवी मंदिर परिसर सुशोभीकरणाचा मार्ग खुला : आमदार गावित

सकाळ वृत्तसेवा

धुळे : पर्यटन व सांस्कृतिक विभागाने दिलेली स्थगिती उठविल्याने खानदेश कुलस्वामिनी श्री एकवीरादेवी मंदिर परिसर सुशोभीकरण कामाचा मार्ग मोकळा झाल्याची माहिती आमदार मंजुळा गावित यांनी दिली. या निर्णयाबद्दल त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व पर्यटनमंत्र्यांचे आभार मानले. (Way to beautify Ekvira Devi temple area open MLA Gavit Dhule News)

हेही वाचा : ज्ञानेश्वरीत आहेत HR निगडित व्यवस्थापन सूत्रे...

श्री एकवीरादेवी मंदिर परिसरात विकासकामे करणे, सभामंडप, प्रवेशद्वार, भक्त निवास आदींसाठी पर्यटन व सांस्कृतिक विभागाकडून तीन कोटींचा निधी फेब्रुवारी २२ मध्ये मंजूर झाला. पैकी ९० लाखांचा निधी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांकडे वर्ग झाला. या विभागासह श्री एकवीरादेवी व रेणुकामाता मंदिर ट्रस्टच्या पदाधिकाऱ्यांनी मंदिराच्या विकासकामांचा आराखडा तयार करून निविदा प्रसिद्ध केली; परंतु शासनाकडून २०२१-२०२२ या वर्षातील प्रशासकीय मान्यता दिलेल्या कामांसदर्भात स्थगिती देण्यात आली होती.

मंदिर ट्रस्टींनी मुख्यमंत्री, तसेच पर्यटन व सांस्कृतिक मंत्र्यांना मंदिराच्या कामांसंदर्भात दिलेली स्थगिती उठवावी, अशी मागणी केली होती. त्यानुसार मुख्यमंत्र्यांसह पर्यटन व सांस्कृतिक मंत्र्यांनी श्री एकवीरादेवी मंदिर परिसरातील विकासकामांबाबत कार्यवाही करण्यास मान्यता दिली आहे. त्यामुळे विविध विकासकामांचा मार्ग मोकळा झाला आहे, असे आमदार गावित यांनी सांगितले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

नागपूर हळहळलं! खरेदीसाठी गेल्या जवानांवर काळाचा घाला, भीषण अपघातात दोंघाचा मृत्यू; ऑटोचालकासह सहा जवान गंभीर जखमी

Shikhar Dhawan: लेकाच्या विरहानं शिखर व्याकुळ; फादर्स डेच्या शुभेच्छा देताना म्हणाला, 'त्याच्याशी बोललो नाहीये...'

Jerusalem : दिवसाउजेडी हल्ले थांबवणार; गाझातील मदतकार्याच्या सोयीसाठी इस्राईलकडून घोषणा

Russia-Ukraine Conflict : ‘युक्रेन’बाबत स्वित्झर्लंडमध्ये बैठक; रशियाच्या अनुपस्थितीने तोडग्याची शक्यता कमीच

Prataprao Chikhlikar: मनोज जरांगेंची हवा नांदेडपर्यंत...! प्रतापराव चिखलीकरांचा गेम कसा झाला?

SCROLL FOR NEXT