crime esakal
उत्तर महाराष्ट्र

Nandurbar Crime News : किराणा मालाच्या दुकानावर गुटख्याची सर्रास विक्री; संबंधित विभागाचे दुर्लक्ष

सकाळ वृत्तसेवा

Nandurbar Crime News : आरोग्यास हानिकारक म्हणून राज्यात गुटखाबंदी असूनही अक्कलकुवा तालुक्यात अवैध गुटखा विक्री जोरात सुरू आहे. विशेष म्हणजे काही किराणा मालाच्या दुकानातून घाऊक विक्री होत आहे.

संबंधित विभागाने त्वरित लक्ष घालून याला आळा घालावा, अशी मागणी परिसरातून होत आहे.(Widespread sale of Gutka at grocery stores in nandurbar crime news )

रात्रीच्या अंधारात गुजरातमधून खासगी वाहनातून अवैधरीत्या आयात करून या खुलेआम विक्रीकडे अन्न व औषध प्रशासन लक्ष देत नसल्याचे बोलले जात आहे. तंबाखूजन्य पदार्थ गुटखा आरोग्यास हानिकारक असल्यामुळे त्यापासून कर्करोगासारखे गंभीर आजार होतात.

या पदार्थांचे सेवन करणाऱ्याला सावधानतेचा इशाराही गुटखा, तंबाखूच्या पुड्यांवर नमूद केला जातो. तरुण पिढी जीवघेण्या आजारापासून वाचावी यासाठी शासनाने यावर बंदीही घातली आहे.अक्कलकुव्यासह कोराई, खापर, मोलगी येथे काही किराणा दुकाने व पानटपरीवर गुटखा विक्री राजरोसपणे सुरू आहे.

नागरिक कर्करोगासारख्या जीवघेण्या आजाराला बळी पडू नयेत म्हणून गुटखा, सुगंधित तंबाखू, खर्रा आदी वस्तूंवर कायद्याने बंदी आणली होती; परंतु त्यानंतरही येथील काही दुकानदार किराणा मालाच्या नावाखाली सुगंधित गुटख्याची घाऊक विक्री सहजपणे करताना दिसून येत आहे. अक्कलकुवा तालुक्याची सीमा गुजरातला लागते.

गुजरातमध्ये गुटखाबंदी नाही, त्यामुळे तेथून रात्रीच्या अंधारात गुटखा आणून दिवसा राजरोसपणे विक्री होते. शाळा, तसेच महाविद्यालय परिसराच्या शंभर मीटरच्या आत तंबाखूजन्य पदार्थ विकण्यास तसेच सेवन करण्यास बंदी असतानाही शाळा व विद्यालयाजवळच्या अनेक दुकानांतून गुटखाविक्री सुरू आहे.

शाळकरी मुले व महाविद्यालयीन तरुणांमध्ये या व्यसनाचे प्रमाण वाढत असून, डोळेझाक करणारी सरकारी यंत्रणा याला कारणीभूत असल्याचे मत अनेक पालकांचे आहे.

सामाजिक हानी

गुटख्यामुळे देशाचे भावी आधारस्तंभ असलेल्या तरुण पिढीचे आरोग्य धोक्यात आले आहे. यामुळे व्यसनाधीनता मोठ्या प्रमाणात वाढत असून, युवा पिढी गारद होत आहे. ही मोठी सामाजिक हानी आहे.

जाणीवपूर्वक दुर्लक्ष

पोलिस, अन्न व औषधी प्रशासन विभागाने गुटखा विक्रीकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्यामुळे सर्रास विक्री सुरू आहे. प्रत्येक गावपड्यावर, शाळा, महाविद्यालय परिसरात पुड्या मिळतात. असे असतानाही संबंधित यंत्रणेला कोणाच्या आरोग्याची काळजी दिसत नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kalyan Dombivli Election : आमदारांच्या मुलाचा बिनविरोध विजय; कल्याण-डोंबिवलीत शिवसेना शिंदे गटाची घोडदौड वेगात!

Sudhakar Badgujar : नाशिक भाजपमध्ये बडगुजर पॅटर्नचा धमाका; पत्नी आणि पुत्रासह स्वतःची उमेदवारी केली निश्चित

Latest Marathi News Live Update : एरंडोल नगरपालिका निवडणुकीत पाच अविवाहित युवकांचा विजय

BEE Star Rating : इलेक्ट्रॉनिक वस्तु खरेदीचे नियम बदलले; लागू झाला BEE स्टार रेटिंगचा आदेश, थेट तुमच्या खिशावर होईल परिणाम

Khus Khus Halwa: गाजर किंवा मूगडाळीचा हलवा विसरा! या हिवाळ्यात ट्राय करा पौष्टिक आणि चविष्ट ‘खसखस हलवा’

SCROLL FOR NEXT