Bribe News esakal
उत्तर महाराष्ट्र

शेतकऱ्याकडून लाच स्वीकारताना वायरमनसह खासगी पंटरला अटक

शेतकऱ्यास कृषी वीज पंपासाठी करायची होती वीज जोडणी

सकाळ वृत्तसेवा

नंदुरबार : शेतातील वीज जोडणीसाठी रजाळे (ता.नंदुरबार) येथील शेतकऱ्याकडून २७ हजार पाचशे रूपयाची लाच स्वीकारताना वीज वितरण कंपनीचा वायरमनसह खासगी पंटराला लाच लुचपत प्रतिबंध विभागाने रंगेहाथ पकडले आहे.

रजाळे (ता.नंदुरबार) येथील शेतकऱ्यास कृषी वीज पंपासाठी वीज जोडणी करायची होती. त्यासाठी शेतकऱ्याने नंदुरबार वीज वितरण कार्यालयाकडे ऑक्टोबर २०२१ ला वीज जोडणी मागणी अर्ज ऑनलाइन भरला आहे. त्यानंतर डिमांड नोट मिळावी म्हणून वारंवार चकरा सुरू होत्या. शेवटी रजाळे येथे नियुक्तीस असलेले वीज वितरण कंपनीचे वायरमन (तंत्रज्ञ) अनिल मांगडू भोये याने रजाळे गावातील खासगी वायरमन असलेला देवानंद पंडित मराठे याच्यामार्फत शेतकऱ्याकडून ३० हजाराची लाच मागितली होती. शेवटी तडजोडीअंती शेतकऱ्याने २७ हजार पाचशे रुपये देण्याचे निश्‍चित झाले. त्यात १५ हजार रुपये डिमांड नोट रक्कम व १२ हजार पाचशे लाचेचा समावेश आहे. दरम्यान, या बाबत संबंधित शेतकऱ्याने लाच लुचपत प्रतिबंध विभागाकडे तक्रार केली. त्यानंतर आज रक्कम देण्याचे निश्‍चित केले. त्यानुसार आज लाच लुचपत प्रतिबंध विभागाने सापळा रचला. त्यानंतर खासगी वायरमन देवानंद मराठे यांच्यामार्फत २७ हजार पाचशे रुपये स्वीकारताना लाच लुचपत प्रतिबंध विभागाने मराठे व मांगडू भोये या दोघांना रंगेहाथ पकडले. दोघांविरुद्ध पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून दोघांना अटक केले आहे.

लाचलुचपत प्रतिबंध विभागाचे उपअधीक्षक राकेश चौधरी, पोलिस निरीक्षक समाधान वाघ, पोलिस निरीक्षक माधवी वाघ, हवालदार विलास पाटील, विजय ठाकरे, अमोल मराठे, देवराम गावित, ज्योती पाटील, श्री. नावाडेकर, मनोज अहिरे, जितेंद्र महाले यांच्या पथकाने ही कारवाई केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ganesh Naik Eknath Shinde : ‘बाटलीतली भूतं बाहेर काढली, आता अंगाशी येत आहेत’; गणेश नाईक-एकनाथ शिंदेंमधील वाद पुन्हा उफाळला

Kolhapur Politics: मंत्री हसन मुश्रीफ-डॉ. विनय कोरे यांच्यात खलबते; बंद दाराआड तासभर चर्चा, तपशील गुलदस्त्यात

IND vs SL Final: भारत-श्रीलंका फायनलमध्ये रंगणार थरार! शेफाली-दीप्ती ठरणार गेमचेंजर; आठव्यांदा ट्रॉफी जिंकण्याची संधी

Kolhapur Accident: मृत्यूने गाठले, घर-संसाराचे स्वप्न अपूर्ण राहिले; प्लंबिंगचे साहित्य घेऊन येताना महेशच्या दुचाकीची थांबलेल्या टेम्पोला धडक

BRICS Declaration: ‘ब्रिक्स’ची एकजुटीची हाक; युद्धखोरांना आरसा, नवी दिल्ली जाहीरनामा मंजूर

SCROLL FOR NEXT