Late Swara Shelar esakal
उत्तर महाराष्ट्र

धुळे : जीर्ण वीजतारेचा शॉक लागून महिलेचा मृत्यू

खेमचंद पाकळे

लामकानी (जि. धुळे) : लग्नानिमित्त लामकानी येथे आजी आजोबांना भेटण्यासाठी आलेल्या एका महिलेचा वीज तारेचा शॉक (Electric Wire Shock) लागून मृत्यू झाल्याची घटना १६ मेस घडली आहे. (Woman dies due to shock of power line Dhule News)

स्वरा पंकज शेलार (वय २३ ) असे या महिलेचे नाव असून, घराच्या गच्चीवर उन्हात टाकलेले कपडे काढण्यासाठी स्वरा गेली असता हवेच्या झोक्यात घरासमोरील मुख्य प्रवाह वीज तार साडीला लागून स्वराला जबर वीजेचा धक्का बसला. तिला तत्काळ धुळे येथील जिल्हा रुग्णालयाला नेले असता डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले. येथील योगेश महाले यांची मुलगी होत. स्वराचा नंदुरबार जिल्ह्यातील एचाळे येथील पंकज शेलार यांच्याशी दोन वर्षापूर्वीच विवाह झाला होता. त्यांना दहा महिन्याची लहान मुलगी आहे.

जीर्ण तारांनीच स्वराचा घात केल्याचे ग्रामस्थांनी महावितरणच्या निष्काळजीपणा विषयी संताप व्यक्त केला आहे. महावितरणचे विद्युत निरीक्षक महाजन,अतिरिक्त कार्यकारी अभियंता आर.एम.पाटील,सहाय्यक अभियंता काकडे यांनी लामकानीला भेट दिली. भेटीप्रसंगी, स्वराच्या मृत्यूस महावितरणच जबाबदार असे म्हणत पंचायत समिती सदस्य तुषार महालेंनी महावितरण अधिकाऱ्यांना धारेवर धरले आहे. तीन मार्चला महावितरणला जीर्ण तारा तत्काळ बदलण्याच्या दिलेल्या मागणी पत्राचा उल्लेख त्यांनी यावेळी केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

जंतर मंतर आंदोलन स्थळांच्या यादीतून वगळलं, दिले ३ पर्याय; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारसीनंतर दिल्ली पोलिसांचा निर्णय

Pune News: चाकणमध्ये हृदयद्रावक घटना! मोबाईलवरून वाद, वडिलांच्या दोन थपडा अन् १७ वर्षीय विद्यार्थ्याचा मृत्यू, सायकलनेच दिला सुगावा..

माधुरी दीक्षितने डॉक्टर असलेल्या नेनेंसोबत लग्न का केलं? सोनाली बेंद्रेसमोर सांगितलं खरं कारण; म्हणाली- मी अशा माणसाशी लग्न केलंत जो...

Latest Marathi News Live Update : दिल्लीतील आंदोलनांसाठी जंतरमंतर बंद; निदर्शनांसाठी तीन नवी ठिकाणे निश्चित

Panvel News: पनवेलचा 'ताप' वाढला! धोक्याची घंटा; पर्यावरण अहवालात दीड अंशाच्या वृद्धीची नोंद

SCROLL FOR NEXT