Womans are capable to overcome obstacles, says Gavit 
उत्तर महाराष्ट्र

अडीअडचणींवर मात करण्याची महिलांत क्षमता

सकाळ वृत्तसेवा

वार्साः प्रशिक्षणानंतर मिळालेल्या शिलाई यंत्रांच्या माध्यमातून सध्याचा काळ व लोकांची गरज ओळखून आपला व्यवसाय वाढवा. सर्व प्रकारच्या अडीअडचणींवर मात करण्याची क्षमता महिलांमध्ये नक्कीच आहे, असा विश्‍वास आमदार मंजुळा गावित यांनी व्यक्त केला.

साक्री तालुक्‍यातील आदिवासी बांधवांच्या उद्योगशीलतेला चालना देण्यासाठी "नाबार्ड'च्या नॅब स्कील योजनेअंतर्गत लुपीन फाउंडेशनतर्फे एसटी संवर्गातील निवडक 90 लाभार्थ्यांना दोन महिन्यांचे शिवणकाम प्रशिक्षण जेबापूर (ता. साक्री) येथील अद्ययावत प्रशिक्षण केंद्रात देण्यात आले. प्रशिक्षणार्थींना स्वतःचा उद्योग-व्यवसाय सुरू करण्यासाठी "नाबार्ड' व लुपीन फाउंडेशनतर्फे शिलाई यंत्रांसह प्रमाणपत्रांचे वाटप झाले, त्यावेळी आमदार गावित बोलत होत्या. नाबार्डचे धुळे जिल्हा उपप्रबंधक विवेक पाटील, पंचायत समितीच्या सभापती प्रतिभा सूर्यवंशी, पिंपळनेरचे अपर तहसीलदार विनायक थवील, डॉ. तुळशीराम गावित, ऍड. ज्ञानेश्वर एखंडे, रोहोडचे सरपंच हिंमत साबळे आदी उपस्थित होते.

संस्थेचे वरिष्ठ प्रकल्प समन्वयक संदीप झणझणे यांनी प्रास्ताविक केले. विवेक पाटील यांनी नाबार्डच्या उपक्रमाची माहिती दिली. श्री. थवील, ऍड. एखंडे यांनीही मार्गदर्शन केले. प्रथम, द्वितीय व तृतीय आलेल्या प्रशिक्षणार्थींना प्रमाणपत्र देण्यात आले. प्रातिनिधिक स्वरूपात तीन महिलांना शिलाई यंत्रांचे, 25 लाभार्थ्यांना नाश्‍ता लॉरीचे, निवडक भाजीपाला विक्रेत्यांना व्यवसायासाठी मोठ्या छत्र्यांचे, तर नाबार्डअंतर्गत भूमिहीन लाभार्थींना उद्योग- व्यवसायासाठी वेल्डिंग मशिन, ऑल इन वन प्रिंटर मशिनचे वितरण झाले.

राहुल ठाकरे यांनी सूत्रसंचालन केले. निलेश पवार यांनी आभार मानले. लुपीन फाउंडेशनचे सचिन सोनारघरे, राजेंद्र पगारे, उमाकांत पाटील, गणेश पगारे, मनोज एखंडे, रोहित दाभाडे, विजय ज्ञानेश, मनोहर अहिरे, एकनाथ मावची, जयवंत कापडे, संगीत चौरे, दिनेश घरटे यांनी संयोजन केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rahul Gandhi: दुसरी पत्रकार परिषद घेऊन राहुल गांधींनी काय सिद्ध केलं? निवडणूक आयोगाला दिलेला अल्टिमेटम नेमका काय आहे?

Pune Encroachment : शहरातील हजारो चौरस फुटावरील अतिक्रमण हटवले

Teachers Award : १०९ शिक्षकांना राज्य शिक्षक पुरस्कार जाहीर; पुणे जिल्ह्यातील सहा शिक्षकांचा समावेश

Ayush Komkar Case : आयुषच्या खूनापुर्वी आरोपींची एकत्रित बैठक; वनराज आंदेकरची पत्नी अटकेत, पुरवणी जबाबात सोनालीचा सहभाग असल्याची माहिती

Latest Maharashtra News Updates : दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी वाचा एका क्लिकवर...

SCROLL FOR NEXT