Women’s issues are getting neglected in Songir 
उत्तर महाराष्ट्र

महिलांचे प्रश्‍न रामभरोसेच 

सकाळ वृत्तसेवा

सोनगीरः शासनाच्या आदेशानंतरही येथील ग्रामपंचायतीतर्फे महिलांच्या विशेष ग्रामसभाच होत नसल्याने महिलांचे प्रश्‍न रामभरोसेच राहत आहेत. गेल्या पाच वर्षांत सुरवातीला महिलांच्या काही ग्रामसभा झाल्या. पण यात केवळ औपचारिकता होती. नंतर महिलांचीही उपस्थिती राहत नसल्याने या ग्रामसभांना काही अर्थच उरला नाही. त्यामुळे महिलांच्या ग्रामसभा घेणेच बंद झाले आहे.
शासनाच्या आदेशान्वये प्रत्येक ग्रामपंचायतीला महिलांच्या ग्रामसभा घेणे बंधनकारक आहे.

 गाव पातळीवर पुरुषप्रधान व्यवस्थेमुळे ग्रामसभेत महिला मोकळेपणाने बोलू शकत नाहीत व आपल्या समस्या, अडचणीही मांडू शकत नाहीत. यामुळे महिला ग्रामसभेला अनेक अधिकार देण्यात आले आहेत. यातून महिलांचे सबलीकरण करून त्यांचा गाव विकासात सहभाग वाढावा, हा हेतू आहे. 2002 पासून महिला ग्रामसभा घेतल्या जात आहेत.

येथील ग्रामपंचायतीत नऊ महिला सदस्या आहेत. मात्र, त्याच महिलांच्या ग्रामसभेस उपस्थित राहत नाहीत. बऱ्याचदा महिला सदस्यांचे पती किंवा अन्य पुरुष नातेवाईक प्रतिनिधीच हजर राहत. यातच महिला ग्रामसभेसाठी एक दिवस आधी दवंडी देणे, बचत गट, आरोग्य सेविका, अंगणवाडी सेविकांना बोलावणे हे प्रकारही बंद झाले. परिणामी महिलांना ग्रामसभा असल्याचे माहितीच होत नसे.

बऱ्याचदा ग्रामसभेला ग्रामपंचायत सदस्य, महिलांनी यावे म्हणून आधी आलेल्या महिलांना वाट पाहावी लागे. ग्रामीण भागात बहुतांश महिला शेतीकामांसाठी जात असल्याने महिलांची उपस्थिती रोडावत गेली.आणि अखेर महिला ग्रामसभाच बंद झाल्या. महिला येत नसल्याने घरोघरी जाऊन इतिवृत्तावर सह्या घेऊन ग्रामसभा झाली, असे दाखविण्याचा प्रयत्नही झाला. शासनाचे उद्देश प्रामाणिक असले तरी ते राबविणारे प्रामाणिक असणे आवश्‍यक असल्याचे यात दिसून येत आहे.

महिला ग्रामसभा घेणे आवश्‍यक असते. ग्रामपंचायतीने अनेकदा प्रयत्न करूनही महिलाच ग्रामसभेत उपस्थित राहत नाहीत. यामुळे ग्रामसभेतील विषय कोणासमोर मांडणार किंवा महिलांच्या समस्या कशा सोडविणार?
- विशाल मोरे, ग्रामपंचायत सदस्य, सोनगीर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

TMC Symbol Row : निवडणूक आयोगाने 'तृणमूल'चे चिन्ह गोठवले ! ममता आणि रितब्रता गटांकडून मागवले नवे चिन्ह अन् नाव

Maharashtra SSC Exam 2027 : दहावीच्या विद्यार्थ्यांनो, तयारीला लागा! बोर्ड परीक्षेच्या तारखा जाहीर, जाणून घ्या संपूर्ण वेळापत्रक

IND vs AFG 3rd T20I: इथे-तिथे-सगळीकडे राशिद खान... भन्नाट रन आऊट अन् दोन अविश्वसनीय झेलने फिरवली मॅच; Video Viral

US OPT Fee : अमेरिकेत शिक्षणानंतर नोकरी करण्याचा मार्ग महागणार? द्यावे लागणार एक कोटींचे OPT शुल्क, भारतीय विद्यार्थ्यांवर मोठा परिणाम

Eknath Shinde Dare Village : शिवसेना पक्ष-धनुष्यबाण चिन्हाबाबत सुप्रीम कोर्टात सुनावणी सुरू असतानाच, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे थेट दरे गावात दाखल

SCROLL FOR NEXT