Girl Tried to suicide
Girl Tried to suicide Sakal
उत्तर महाराष्ट्र

परीक्षेच्या भीतीने नदीत उडी मारुन तरुणीचा आत्महत्येचा प्रयत्न; पण...

सकाळ डिजिटल टीम

नंदुरबारमधल्या एका महाविद्यालयीन तरुणीने तापी नदीच्या पुलावरून उडी मारून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. मात्र नदीतल्या मच्छिमारांच्या सतर्कतेमुळे तिचे प्राण वाचले आहेत. ही मुलगी आता सुखरूप असून तिची ओळखही पटली आहे.

ही युवती घरातून बसने निघाली. त्यानंतर निझर तालुक्यातल्या वेलदा टाकीजवळ ती उतरली आणि तिथून चालत कुकरमुंडा इथल्या तापी नदीच्या पुलावर गेली. तिथून ५०-६० फुटांवरून तिने खाली उडी मारली. त्यानंतर ही मुलगी बुडत असल्याचं आजूबाजूच्या लोकांच्या लक्षात आलं. त्यांनी आरडाओरडा करण्यास सुरुवात केली. (Suicide attempt by the girl, facing fear of Examination)

त्यानंतर नदीत मासेमारी करणाऱ्या तरुणांनी तिला वाचवण्यासाठी जलद गतीने मुलीच्या दिशेने आपली बोट नेली. पण वाऱ्याचा वेग अधिक असल्याने या बचावकार्यात अडथळा येत होता. अखेर अनेक खटपटीनंतर मच्छिमारांना या तरुणीला वाचवण्यात यश आलं. त्यांनी बोटीवर टाकून तिला किनाऱ्याशी आणलं आणि त्यानंतर रुग्णवाहिकेतून रुग्णालयात दाखल केलं.

कोण होती ही युवती?

अक्कलकुवा तालुक्यातल्या गंगापूर गावात ही युवती राहत आहे. पार्वती रवींद्र पाडवी असं तिचं नाव असून ती बीएच्या दुसऱ्या वर्षात शिकत आहे. तिची १५ जूनला परीक्षा आहे. पण परीक्षेचा अभ्यास न झाल्याने, नापास होण्याच्या भीतीने तिने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याची माहिती मिळत आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MDH Everest Spices: एमडीएच आणि एव्हरेस्ट मसाल्यांवर भारताच्या शेजारील देशानेही घातली बंदी; कंपनीने दिले स्पष्टीकरण

IPL 2024 : थाला फॉर अ रीजन! धोनीसाठी पठ्ठ्याने गर्लफ्रेंडसोबत केला ब्रेकअप; पोस्टरचा सोशल मीडियावर धुमाकूळ

Mumbai Local News : रेल्वे रुळावरून घसरली CSMT लोकल; वहातूक ठप्प

PM Modi : 'सामान्य नागरिकाच्या घराचं वीज बिल शून्यावर आणणं माझं ध्येय'; पंतप्रधान मोदींनी सांगितला फ्युचर प्लॅन

Latest Marathi News Live Update: राजन विचारे उमेदवारी अर्ज दाखल करायला निघाले; ठाकरेंची उपस्थिती

SCROLL FOR NEXT