Crime News esakal
उत्तर महाराष्ट्र

Dhule Crime News : वाद सोडविण्यास गेलेल्या तरुणास बेदम मारहाण

सकाळ वृत्तसेवा

Dhule News : मित्राचा वाद सोडविण्यासाठी गेलेल्या तरुणाला तिघांनी बेदम मारहाण करून जखमी केल्याची घटना सडगाव (ता. धुळे) शिवारात घडली. या प्रकरणी तिघांवर गुन्हा दाखल झाला.

असाराम दयाराम मोरे (वय २०, रा. सडगाव) असे जखमी मारहाणीत तरुणाचे नाव आहे. याबाबत त्याने धुळे तालुका पोलिसांत फिर्याद दिली. (young man who went to settle dispute was brutally beaten Dhule News)

त्यानुसार ३१ मेस रात्री बाराच्या सुमारास गावातील उंबर भिलाटीजवळील हडोला भागात संजय ईश्‍वर न्याहदे, शत्रुघ्न धर्मा शिंदे व विजय वसंत शिंदे सर्व (रा. सडगाव) यांचे बबलू ऊर्फ प्रवीण संतोष शिंदे याच्यासोबत भांडण सुरू होते.

ते सोडविण्यासाठी आसाराम गेला असता त्यास तिघांनी शिवीगाळ करत दगडाने डोक्यावर मारले, तर शत्रुघ्न व विजय या दोघांनी आसारामला पकडून संजयने पोटात हाताबुक्क्यांनी मारहाण करत जबर जखमी केले.

तसेच ठार करण्याचीही धमकी दिली. या प्रकरणी मारहाण करणाऱ्या तिघांवर धुळे तालुका पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिस उपनिरीक्षक महादेव गुट्टे तपास करत आहेत.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Bangalore Highway : 92 पिलर अन् 3.47 किमी लांबी! पुणे-बंगळूर महामार्गावरील सर्वात मोठा पूल वाहतुकीसाठी कधी खुला होणार? लोकार्पण लांबणीवर, वाचा नवीन अपडेट

ICAI CA Toppers List : डोंबिवलीचा सुपुत्र देशभर गाजला! सोहन मांजरेकर ठरला देशातील तिसरा CA टॉपर; संपूर्ण टॉपर यादी पाहा

Shubman Gill:'गिलला टी-२० संघातून का डच्चू दिला?' मोहम्मद अझरुद्दीनचा BCCI ला थेट सवाल

Eknath Shinde यांनी लोकसभेतील संख्याबळाचे गणित बदललं! NDA मध्ये बनतील शक्तिशाली नेते; जागांचे गणित पाहा...

Farmer Protest: कर्जमुक्तीच्या लढ्याचा वणवा राज्यभर! तहसील कार्यालयावर व पाण्याच्या टाकीवर चढले शेतकरी, बुलडाण्यात आत्मदहनाचा प्रयत्न

SCROLL FOR NEXT