crime esakal
उत्तर महाराष्ट्र

Dhule Crime News : वाद सोडविण्यास गेलेल्या तरुणावर चाकूने वार

सकाळ वृत्तसेवा

Dhule Crime News : पाटण (ता. शिंदखेडा) येथील आशापुरी देवीचा यात्रेत गुरवारी (ता.६) रात्री आठ वाजेच्या सुमारास दोन जणांमधील वाद मिटविण्यासाठी तरुण गेला असता त्याचा राग आल्याने संबंधिताने चाकूने भोसकले. (young man who went to settle dispute was stabbed with knife dhule crime news)

जखमीस काल रात्री उशिरा धुळे जिल्हा रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. पाटण येथील महादेव आदिवासी वस्तीत राहणारे फिर्यादी सागर आनंदा मोरे (वय ३०) हा आशापुरी देवीची यात्रोत्सव बघण्यासाठी जात असताना रस्त्यात वीटभट्टी जवळ त्याचे मामा व अजय मराठे, भय्या भिल व उमेश भिल यांचे भांडण सुरू होते.

सागर याने मामाशी का भांडत आहेत, असे विचारले असता अजय मराठे (रा.जनता हायस्कूल शिंदखेडा) याला त्याचा राग आला. त्याने सागर याच्या छातीवर चाकू मारून जखमी केले. तत्काळ शिंदखेडा येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी त्याला लगेच धुळ्याला जिल्हा रुग्णालयात उपचारार्थ हलविले.

हेही वाचा : सामान्यांचा पैसा सुरक्षित ठेवण्यासाठीच Virtual Currency करकक्षेत

आज (ता.७) पोलिसांनी त्याचा जबाबावरून अजय मराठे, भय्या भिल व उमेश भिल (दोन्ही राहणार साबरहट्टी भिलाटी, शिंदखेडा) या तिघांविरुद्ध शिंदखेडा पोलिस ठाण्यात जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याच्या गुन्ह्याची नोंद केली आहे. पोलिस निरीक्षक सुनील भाबड यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक मिलिंद पवार तपास करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs NZ: Virat Kohli त्याचे सामनावीर ट्रॉफी कुठे ठेवतो? न्यूझीलंडविरुद्ध पुरस्कार जिंकल्यानंतर सांगून टाकलं

WPL 2026, DC vs GG: १ बॉल अन् ५ धावा... गुजरात जायंट्सने मिळवला थरारक विजय, जेमिमाच्या दिल्लीचा सलग दुसरा पराभव

२०१४पासून अदानीकरण! हे बघून भीती वाटली नाही तर निवडणूक न लढलेली बरी; राज ठाकरेंनी दाखवले VIDEO

Bigg Boss Marathi 6: ९० दिवस, १७ स्पर्धक; पाहा 'बिग बॉस मराठी ६' च्या घरातील स्पर्धकांची यादी

अजित पवारांना लाथ मारून हाकला किंवा माफी मागा, गाडीभर पुरावे कोर्टात द्या; भ्रष्टाचारावरून ठाकरे बंधूंनी फडणवीसांना घेरलं

SCROLL FOR NEXT