crime news esakal
उत्तर महाराष्ट्र

गाडी घेण्याच्या वादातून लहान भावाने केला मोठ्या भावाचा खून

दोन्ही भावंडांमध्ये घरात वाहन घेण्यावरून वाद झाला.

सकाळ वृत्तसेवा

नंदुरबार : घरात किरकोळ वादातून कुटुंबीय तुलाच सर्व काही घेऊन देतात असे लहान भावास बोलून मोठा भाऊ रागात काठी गावाच्या रस्त्याकडे जात असताना लहान भावाने भरधाव वेगाने चार चाकी वाहन चालवून मोठ्या भावास धडक देऊन जागीच ठार केले. काठीचा निंबीपाडा (ता अक्कलकुवा) येथे ही घटना घडली. याबाबत खुनाचा गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

काठीच्या निंबीपाडा येथे २५ मे रोजी सायंकाळी विशाल सायसिंग पावरा (वय २५) व अजय सायसिंग पावरा (वय -२८) या दोन्ही भावंडांमध्ये घरात वाहन घेण्यावरून वाद झाला. अजय लहान आहे तर विशाल मोठा भाऊ असताना घरातील सर्व कुटुंबातील सदस्य तुलाच मदत करतात व गाडीही तुलाच घेऊन दिली असे बोलून मलाही गाडी पाहिजे अशी सूचना देत विशाल पावरा हा रागाच्या भरात घरातून निघून काठी गावाच्या रस्त्याने जाण्यासाठी निघाला यावेळी त्याचा लहान भाऊ विशाल याला राग आला त्याने आपल्या मालकीची महिंद्रा मॅक्स चार चाकी वाहनाने अजय याच्या याच्या पाठलाग साठी भरधाव वेगाने वाहन चालवले तसेच अजयला रस्त्यात गाठून मागून वाहनाने जोरदार धडक देत जागीच ठार केले. वाहनाच्या धडकेत एक गंभीर जखमी झाल्याने अजयच्या जागीच मृत्यू झाला. याबाबत त्यांचे वडील सायसिंग पावरा यांची मुलगी पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून विशाल पावरा विरुद्ध खुनाचा गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Fake FASTag Annual Pass : सावधान! बनावट ‘फास्टॅग वार्षिक पास’ने सुरू आहे फसवणूक; ‘NHAI’ने दिला इशारा

कधी सुरू झाली कधी संपली कळलंच नाही! ३ महिन्यात स्टार प्रवाहची मालिका ऑफ एअर; 'या' दिवशी असणार शेवटचा भाग

VIRAL VIDEO: “गलत करते हो यार…” रोहित शर्मा संतापला; चिमुकलीच्या सुरक्षिततेसाठी पुढे सरसावला, मुंबई विमानतळावर काय घडलं?

राम कपूर अन् साक्षी तंवर यांचा 'तो' बोल्ड सीन; पत्नी गौतमीला कानोकान नव्हती खबर, रात्री समजलं तेव्हा...

Latest Marathi News Live Update: मनसे अध्यक्ष राज ठाकरेंचा मुंबईत झंझावाती प्रचार

SCROLL FOR NEXT